सिने सेन्सॉरशिप कायद्याला अमोल पालेकर यांचे आव्हान

By Admin | Updated: April 18, 2017 00:46 IST2017-04-18T00:46:25+5:302017-04-18T00:46:25+5:30

चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच्या सेन्सॉरशिपच्या नियमात बदल व्हावेत, या मागणीसाठी प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली

Amol Palekar challenges Cine Censorship laws | सिने सेन्सॉरशिप कायद्याला अमोल पालेकर यांचे आव्हान

सिने सेन्सॉरशिप कायद्याला अमोल पालेकर यांचे आव्हान

नवी दिल्ली : चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच्या सेन्सॉरशिपच्या नियमात बदल व्हावेत, या मागणीसाठी प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, तिच्या आधारे न्या. ए. के. सिकरी आणि न्या. अशोक भूषण यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला सोमवारी नोटीस बजावली.
सेन्सॉर बोर्डावर न्यायालयीन पार्श्वभूमीचा एकही सदस्य नसल्याने चित्रपटाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्काकडे दुर्लक्ष
होते, असे अमोल पालेकर यांचे वकील गोपाल सुब्रमण्यम यांनी न्यायालयाला सांगितले. पालेकर यांनी याचिकेमध्ये सिनेमॅटोग्राफी कायद्यातील तरतुदींना आव्हान दिले आहे. इंटरनेटच्या जमान्यात सेन्सॉरशिप अयोग्य असल्याचे पालेकर यांचे म्हणणे आहे. त्यांनी सेन्सॉरशिपच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, न्यायालयाने काही मार्गदर्शक तत्त्वे आखून द्यावीत, अशी विनंतीही केली आहे. 

Web Title: Amol Palekar challenges Cine Censorship laws