अमिताभ यांनी गुजरातच्या गाढवांची जाहिरात करू नये - अखिलेश

By Admin | Updated: February 20, 2017 15:56 IST2017-02-20T15:49:06+5:302017-02-20T15:56:16+5:30

समादवादी पक्ष आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाची मालिका रंगलेली असताना राज्याचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आता या वादामध्ये महानायक अमिताभ बच्चन यांना ओढले आहे.

Amitabh should not promote Gujarat's donkeys - Akhilesh | अमिताभ यांनी गुजरातच्या गाढवांची जाहिरात करू नये - अखिलेश

अमिताभ यांनी गुजरातच्या गाढवांची जाहिरात करू नये - अखिलेश

 ऑनलाइन लोकमत 

लखनऊ, दि. 20 - उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात समाजवादी पक्ष आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाची मालिका रंगलेली असताना राज्याचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आता या वादामध्ये महानायक अमिताभ बच्चन यांना ओढले आहे. रायबरेली येथील प्रचारसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करताना त्यांनी अमिताभ यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले.  
 
मी महानायक अमिताभ बच्चन यांना विनंती करतो की, त्यांनी गुजरातमधल्या गाढवांची जाहीरात करणे बंद करावे. गुजरातच्या गाढवांची प्रसिद्धी करु नका असे अखिलेश म्हणाले. अमिताभ बच्चन गुजरात पर्यटन विभागाचे ब्रॅण्ड अॅम्बिसेडर असल्याने ते तेथील पर्यटन स्थळांची जाहीरात करतात. 
 
अमिताभ यांच्या पत्नी जया बच्चन समाजवादी पक्षाच्या खासदार आहेत. अखिलेश यांच्या विधानावर भाजपाने जोरदार टीका  सुरु केली आहे. अखिलेश यादव यांचे संतुलन ढळले आहे. त्यांच्या विधानातून नैराश्य दिसते असे भाजपा नेते जीव्हीएल नरसिम्हा राव म्हणाले. 
 

Web Title: Amitabh should not promote Gujarat's donkeys - Akhilesh