शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

पनामा पेपर्स प्रकरणात अमिताभ बच्चन इन्कम टॅक्सच्या रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2017 10:08 IST

पनामा पेपर्स प्रकरणात आयकर विभाग अत्यंत आक्रमकतेने काम करत आहे. याप्रकरणी अधिक माहिती गोळा करण्यासाठी आयकर विभागाने आपले एक पथक ब्रिटिश वर्जिन आइसलँड येथे पाठवले आहे.

ठळक मुद्दे बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक बडया व्यक्तींची नावे पनामा पेपर प्रकरणात समोर आली आहेत. ब्रिटिश वर्जिन आइसलँडचा कॅरेबियाई द्वीप समूहातील टॅक्स हेवन देशांमध्ये समावेश होतो.

नवी दिल्ली, दि. 14  - पनामा पेपर्स प्रकरणात आयकर विभाग अत्यंत आक्रमकतेने काम करत आहे. याप्रकरणी अधिक माहिती गोळा करण्यासाठी आयकर विभागाने आपले एक पथक ब्रिटिश वर्जिन आइसलँड येथे पाठवले आहे. बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक बडया व्यक्तींची नावे पनामा पेपर प्रकरणात समोर आली आहेत. 

ब्रिटिश वर्जिन आइसलँडचा कॅरेबियाई द्वीप समूहातील टॅक्स हेवन देशांमध्ये समावेश होतो. टॅक्स हेवन म्हणजे जिथे कर भरावा लागत नाही असा देश. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार पनामा पेपर्स प्रकरणातून जी नावे समोर आली त्यातील 33 प्रकरणात खटले दाखल केले आहेत. तपासामध्ये आम्ही अजिबात ढिसाळपणा करणार नाही. दुस-या देशांकडून आम्ही माहिती गोळा करत आहोत असे या तपासाशी संबंधित असलेल्या एका अधिका-याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले. 

पनामा पेपर प्रकरणामुळे पाकिस्तानात नवाझ शरीफ यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर भारतातील इन्कम टॅक्स विभाग तपासात ढिसाळपणा दाखवत असल्याची टीका सुरु झाली होती. त्यापार्श्वभूमीवर इन्कम टॅक्स विभागाने तपास अधिक आक्रमकपणे सुरु असल्याचे सांगितले. 

या अधिका-याने अमिताभ बच्चन यांच्यावरील आरोपांच्या चौकशीसंबंधी माहिती देताना सांगितले की, अमिताभ यांनी पनामा कागदपत्रातील एकाही कंपनीशी संबंध नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आम्ही थेट चौकशी सुरु करु शकत नाही. त्यासाठी आम्हाला अधिक माहिती गोळा करावी लागेल. 

पनामा पेपर्स प्रकरणात अनेक आघाडीचे अभिनेते, राजकीय नेते आणि व्यापा-यांची नावे समोर आली आहेत. अमिताभ बच्चन यांनी सुरुवातीलाच त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपण भारतीय नियमांनुसार परदेशात पैसा पाठवला आहे असे त्यांनी सांगितले होते.  

पनामा पेपर्सवरून मोदी सरकारवर शरद यादवांनी चढवला हल्लानितीशकुमारांच्या नेतृत्वाखाली जद(यु) बिहारच्या महाआघाडीतून बाहेर पडला. भाजपाशी हातमिळवणी केल्यानंतर पक्षाचे राज्यसभेतील ज्येष्ठ नेते शरद यादव मौन बाळगून होते. मात्र रविवारी एका ट्विटद्वारे मोदी सरकारवर त्यांनी हल्ला चढवला आहे. मोदी सरकारची हजेरी घेत शरद यादव म्हणतात, ‘पनामा पेपर्समध्ये ज्या भारतीय नावांचा उल्लेख आहे, त्यापैकी एकालाही मोदी सरकारने पकडलेले नाही. परदेशात दडवलेले काळे पैसे परत आणणार ही मोदी सरकारची मुख्य घोषणा होती त्या दिशेने केवळ निवडक कारवाईच आजपर्यंत देशात झाल्याचे चित्र दिसते आहे. शरद यादव पुढे म्हणतात की विविध सेवांच्या नावाखाली जनतेकडून विविध प्रकारचे सेस सरकार वसुल करीत आहे. तथापि या रकमेतून कोणत्याही क्षेत्रात उल्लेखनीय बदल झाल्याचे चित्र देशात दिसत नाही. असफल ठरलेली पीक विमा योजना याचे ठळक उदाहरण आहे.