शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरित मजुरांसाठी 'खुशखबर', अमिताभ बच्चन यांनी केली चार्टर्ड फ्लाइट्सची व्यवस्था!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 17:31 IST

यापूर्वी अभिनेता सोनू सूद यांनीही अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना विशेष विमानाने त्यांच्या घरी सोडले आहे. 

ठळक मुद्देमुंबईत अडकलेल्या उत्‍तर प्रदेशातील कामगारांना त्यांच्या घरी जाता यावे, यासाठी त्यांनी 6 स्‍पेशल चार्टर्ड फ्लाइट्सची व्यवस्था केली आहे. 4 फ्लाइट्स आज 10 जून आणि 2 फ्लाइट्स 11 जूनला रवाणा होणार आहेत.29 मेरोजी 10 बसेसदेखील पाठवल्या होत्या

लखनौ/मुंबई : बॉलीवुडचे महानायक अमिताभ बच्चन स्थालांतरित मजुरांना सातत्याने मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. लॉकडाउन काळात आपल्या कुटुंबापासून दूर अडकलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी बसेसची व्यवस्था करून बिग बींनी त्यांची त्यांच्या कुटुंबीयांशी भेट घालून दिली. यानंतर आता, मुंबईत अडकलेल्या उत्‍तर प्रदेशातील कामगारांना त्यांच्या घरी जाता यावे, यासाठी त्यांनी उत्तर प्रदेशातील गोरखपूर, अलाहाबाद आणि वाराणसीसाठी 6 स्‍पेशल चार्टर्ड फ्लाइट्सची व्यवस्था केली आहे. 

यापूर्वी अभिनेता सोनू सूद यांनीही अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना विशेष विमानाने त्यांच्या घरी सोडले आहे. 

दिलासादायक : जगातल्या 'या' पहिल्या शहरात 'हर्ड इम्यूनिटी'नं होतोय कोरोनाचा खात्मा! पण...

दोन दिवसांत पोहोचणार सर्व विमाने - अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेडचे (ABCL) व्यवस्थापकीय संचालक राजेश यादव यांनी सांगितले, की तांत्रिक कारणांमुळे रेल्वे रद्द झाल्यास स्थलांतरित कामगार आणि मजुरांनी आशा सोडू नये, अशी अमिताभ बच्चन यांची इच्छा आहे. यामुळेच त्यांनी 6 चार्टर्ड विमानांची व्यवस्था केली आहे. या प्रत्येक विमानात 180 लोक बसू शकतील. मिळालेल्या माहितीनुसार,  4 फ्लाइट्स आज 10 जून आणि 2 फ्लाइट्स 11 जूनला रवाणा होणार आहेत. सांगण्यात येते, की ही विमाने गोरखपूर, अलाहाबाद आणि वाराणसीसाठी आहेत.

दिलासादायक! कोरोना होतोय हद्दपार; 'या' 26 देशांमध्ये आता एकही रुग्ण नाही

29 मेरोजी 10 बसेसदेखील पाठवल्या होत्या - यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी उत्तर प्रदेशातील मजुरांसाठी बसेसची व्यवस्थाही केली होती. 29 मेरोजी त्यांनी माहीम दर्गाह ट्रस्ट आणि हाजी अली दर्गाह ट्रस्टच्या सोबतीने 10 बसेस हाजी अलीहून रवाना केल्या होत्या. या बसेसने उत्तर प्रदेशातील लखनौ, अलाहाबाद, गोरखपूर आणि भदोही आदी जिल्ह्यांशी संबंधित जवळपास 250 मजूरांना त्यांच्या घरी पाठवण्यात आले होते. या बसेसमध्ये मजुरांच्या खाण्यापिण्यासह मेडिकल किटचीही व्यवस्था करण्यात आली होती. 

भारतात नेमका कसा आणि कुठून आला कोरोना? संशोधकांनी केला मोठा खुलासा, सांगितलं बरंच काही

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकAmitabh Bachchanअमिताभ बच्चनbollywoodबॉलिवूड