शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

अमित शहांच्या दौऱ्यामुळे प. बंगालमध्ये तणाव?; वाद पेटण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2018 2:58 AM

आसाममध्ये नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझनमधून ४० लाख लोकांची नावे वगळल्याने तृणमूल काँग्रेस व भाजपा यांच्यात टीकायुद्ध सुरू असून, आसामपेक्षा पश्चिम बंगालमध्ये अधिक तणाव दिसत आहे.

नवी दिल्ली/कोलकाता : आसाममध्ये नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझनमधून ४० लाख लोकांची नावे वगळल्याने तृणमूल काँग्रेस व भाजपा यांच्यात टीकायुद्ध सुरू असून, आसामपेक्षापश्चिम बंगालमध्ये अधिक तणाव दिसत आहे. त्यातच भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या ११ आॅगस्ट रोजी कोलकात्याच्या सभेला जाणार असल्याने हा वाद अधिक पेटण्याची शक्यता आहे.शहा यांच्या सभेला परवानगी देण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. आधी ती नाकारल्याचे वृत्त होते. भाजपाने सभेची परवानगी मागितलीच नव्हती, असे पोलीस सांगत होते. आसाममध्ये नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझनमधून ४० लाख लोकांची नावे वगळताच पश्चिम बंगालमध्ये खरे नागरिक शोधण्याची गरज असल्याचे मत तेथील भाजपा नेत्यांनी व्यक्त केले होते. बंगालमध्ये बांग्लादेशींना आश्रय मिळत असल्याचा आरोपही केला होता. त्या पार्श्वभूमीवर शहा यांच्या सभेने तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. एनआरसी प्रसिद्ध झाल्यानंतरचा शहा यांचा पहिलाच दौरा आहे. जूनमधील दौºयात त्यांनी तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपाविरोधात हिंसक कारवाया करीत असल्याचा आरोप केला होता.माजी राष्ट्रपतींचे कुटुंबीयही वगळलेमाजी राष्ट्रपती फक्रुद्दिन अली अहमद यांचा पुतण्या झियाउद्दिन अली अहमद व त्याच्या कुटुंबातील काही सदस्यांची नावेही एनआरसीमध्ये नाहीत. माझ्या वडिलांचे नाव एनआरसीमध्ये नसल्याने आमच्याही नावांचा त्यात उल्लेख नाही. फक्रुद्दिन अली अहमद यांच्या कुटुंबीयांशीही आपण संपर्क साधला असल्याचे झियाउद्दिन यांनी सांगितले.भारत-बांग्लादेशसंबंध बिघडतीलभाजपा एनआरसीद्वारे मतपेटीचे राजकारण करत असून, त्यामुळे भारताचे बांग्लादेशशी संबंध बिघडतील असा दावा करून ममता बॅनर्जी म्हणाल्या की, १९७१ सालापासून मी व माझे कुटुंबीय भारतात राहत असल्याचे पुरावे माझ्याकडेही नाहीत. मला माझ्या पालकांची जन्मतारीख माहीत नाही, तिथे मी मी त्यांचे वास्तव्य कसे काय सिद्ध करणार?रेल रोको : एनआरसीच्या विरोधात आॅल इंडिया मातुआ महासंघ या मागासवर्गीयांच्या संघटनेने पूर्व रेल्वेच्या अनेक स्थानकांवर बुधवारी सकाळी साडेआठ वाजता रेल रोको आंदोलन केले. एनआरसीमुळे असंख्य लोकांचे देशातून उच्चाटन करण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचा आरोप या संघटनेने केला. या आंदोलनामुळे पूर्व रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.

टॅग्स :Amit Shahअमित शाहAssamआसामwest bengalपश्चिम बंगाल