शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मालवणात मध्यरात्री हायव्हॉल्टेज ड्रामा; भाजपा पदाधिकाऱ्याच्या कारमध्ये सापडली लाखोंची रोकड?
2
पाकिस्तानी विमाने भारतीय हवाई हद्दीत उड्डाण करतील, पाकिस्तानचा अजेंडा ४ तासांत उद्ध्वस्त
3
Local Body Elecctions Voting: राज्यातील २६४ नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान
4
आजचे राशीभविष्य, २ डिसेंबर २०२५: सामाजिक क्षेत्रात सफलता व कीर्तीलाभ होण्याची शक्यता
5
ते ६२, ती ४६! ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि जोडी हेडन चर्चेत का?
6
Nashik Mhada Lottery: सोन्याहून पिवळं! फक्त १४ लाखात नाशिकमध्ये म्हाडाचे घर, लोकेशन काय?
7
प्रत्येक स्मार्टफोनमध्ये सरकारचे 'संचार साथी' ॲप; इच्छा असूनही डिलीट करता येणार नाही
8
रुपयाची ९०कडे वाटचाल! रुपयाची आशियातील इतर चलनांच्या तुलनेत वर्षभरात सर्वांत खराब कामगिरी
9
यंग सायंटिस्ट अवॉर्ड ते देशद्रोही! पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या निशांत अग्रवालला जन्मठेपेऐवजी तीन वर्षे कैद
10
अग्रलेख: आयोगावर आक्षेपांचे ढग! विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह तर येणारच
11
Local Body Elections: निवडणुका रद्द करण्यावरून आयोगावर सर्वपक्षीय संताप, पोरखेळ चालल्याची टीका
12
लेख: 'आदर' आदेश काढून 'मागायचा' की वर्तनातून मिळवायचा?
13
...तर बीकेसीतील बुलेट ट्रेन स्टेशनच्या कामाला स्थगिती, तीन दिवसांत मागितले उत्तर
14
देशातील महिलांना मिळणार विनातारण ३ लाखांपर्यंत कर्ज
15
विशेष लेख: बहुराष्ट्रवादाची हार आणि जागतिक संस्थांची थडगी
16
“आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे”: सरसंघचालक मोहन भागवत
17
“मोदी सरकार काय लपवायचा प्रयत्न करत आहे?”; SIR वरून काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा सवाल
18
नगरपरिषद निवडणुकांसाठी एकनाथ शिंदेंचा धडका, १० दिवसांत ५३ सभा; जनता कौल देईल का?
19
पुतिन यांच्या भारत दौऱ्यात सर्वात मोठ्या डीलची तयारी...! संपूर्ण जग बघत राहणार, पाकिस्तान-चीनचं टेन्शन वाढणार
20
महापरिनिर्वाण दिन २०२५: मध्य रेल्वे अतिरिक्त विशेष लोकल सेवा चालवणार; पाहा, वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 22:17 IST

Bihar Assembly Election 2025: भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नितीश कुमार आणि बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत सस्पेन्स वाढवणारं विधान केलं आहे. 

बिहारमधील सत्ताधारी असलेल्या एनडीएने विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली असून, काही कुरबुरी वगळता जागावाटप पूर्ण करून उमेदवारांचीही घोषणा केली आहे. मात्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्रिपदाची माळ पुन्हा नितीश कुमार यांच्याच गळ्यात पडेल का? याबाबत एनडीएमधील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपाने अद्याप आपले पत्ते उघड केलेले नाहीत. दरम्यान, भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नितीश कुमार आणि बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत सस्पेन्स वाढवणारं विधान केलं आहे.

आज तकच्या एका कार्यक्रमात सहभागी झालेले अमित शाह म्हणाले की, एनडीएच्या विजयानंतर बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय आमदार करतील. सध्यातरी बिहारमध्ये एनडीए नितीश कुमार यांच्याच नेतृत्वाखाली लढत आहे. तसेच नितीश कुमार यांच्यावर केवळ भाजपाच नाही तर बिहारच्या जनतेलाही विश्वास आहे.

यावेळी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत आपली भूमिका अधिक स्पष्ट करताना अमित शाह यांनी सांगितले की,  कुणाला मुख्यमंत्री बनवणारा मी कोण? आमच्या एनडीएमध्ये एवढे घटक पक्ष आहेत. निवडणुकीनंतर आम्ही एकत्र बसून आपल्या नेत्याची निवड करणार आहोत. सध्यातरी निवडणुकीत आमचं नेतृत्व नितीश कुमार हेच करत आहेत.

भाजपाचे अधिक आमदार निवडून आले तरीही नितीश कुमार हेच मुख्यमंत्री होणार का? असं विचारलं असता अमित शाह यांनी सांगितले की, आताही आमचे आमदार अधिक आहेत. मात्र नितीश कुमार हेच मुख्यमंत्री आहेत.  

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar CM suspense: Amit Shah's statement on Nitish Kumar raises questions.

Web Summary : Amit Shah's statement leaves Bihar CM post uncertain after elections. NDA will decide its leader post-election, while Nitish Kumar leads now. Shah highlights the NDA's collective decision-making process.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५Nitish Kumarनितीश कुमारAmit Shahअमित शाहBJPभाजपाJanta Dal Unitedजनता दल युनायटेड