शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

अमित शहा आता राहाणार वाजपेयींच्या बंगल्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 03:46 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतरचे महत्त्वाचे मंत्री म्हणून अमित शहा यांच्याकडे पाहिले जाते. शहा सध्या ११ अकबर रोड येथील शासकीय बंगल्यामध्ये राहात आहेत

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे आता माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी पूर्वी वास्तव्याला असलेल्या बंगल्यात राहाणार आहेत. मंत्री झाल्यानंतर केंद्र सरकारने त्यांना हा बंगला मंजूर केला आहे. दिल्लीतील ६ ए, कृष्ण मेनन मार्ग हा अमित शहा यांचा नवीन पत्ता असेल.

यासंदर्भात सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतरचे महत्त्वाचे मंत्री म्हणून अमित शहा यांच्याकडे पाहिले जाते. शहा सध्या ११ अकबर रोड येथील शासकीय बंगल्यामध्ये राहात आहेत. राज्यसभेचे सदस्य म्हणून त्यांना हा बंगला मिळाला होता.अटलबिहारी वाजपेयी अखेरपर्यंत राहात असलेला शासकीय बंगला दिल्लीच्या ल्यूटन भागात आहे. तिथे त्यांचे सुमारे चौदा वर्षे वास्तव्य होते. २००४ साली लोकसभा निवडणुकांत भाजप हरल्यानंतर वाजपेयी यांनी पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान सोडले व ते या बंगल्यात राहायला आले होते. वाजपेयी यांना भेटण्यासाठी अनेक दिग्गज व भाजप नेते ६ ए, कृष्ण मेनन मार्ग येथील बंगल्यामध्ये नेहमी येत असत.

भारतरत्न सोहळ्याचा साक्षीदार

मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात वाजपेयी यांना तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते भारतरत्न किताब प्रदान करण्याचा समारंभ ६ ए, कृष्ण मेनन मार्ग येथील बंगल्यातच पार पडला होता. वाजपेयींच्या निधनानंतर या बंगल्यात त्यांचे स्मारक करावे, अशी काही जणांनी केलेली मागणी सरकारने मान्य केली नव्हती.

टॅग्स :Amit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदीAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी