शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

Amit Shah : टीम फडणवीस दिल्लीत, गृहमंत्री अमित शहांसोबत झाली महत्त्वाची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 22:41 IST

Amit Shah : बैठकीत एफआरपी पेक्षा जास्त दर दिल्यामुळे सहकारी साखर कारखान्यांना इन्कमटॅक्सच्या आलेल्या नोटीसा यासंदर्भात मार्ग काढण्यावर सकारात्मक चर्चा झाली, एकूणच सहकार उद्योगाला उर्जितावस्था व आत्मविश्वास देण्याचे अमित शहा यांनी सुचोवात केले.

ठळक मुद्देया बैठकीनंतर माध्यमांना माहिती देताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, सहकारी साखर कारखानदारीला नवसंजीवनी मिळेल, असे अनेक निर्णय त्यात घेण्यात आले आहेत

नवी दिल्ली - भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजधानी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर, महाराष्ट्रातील नेत्यांना घेऊन फडणवीस यांनी अमित शहांसोबत बैठकही केली. महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखानदारीपुढे पुढील असणाऱ्या एफआरपी, कजांचे पुनर्गठन, थकबाकी, बंद असलेले सहकारी कारखाने, इथेनॉलनिर्मिती अशा अनेक प्रश्नांसदर्भात या बैठकीत चर्चा झाली आहे.

बैठकीत एफआरपी पेक्षा जास्त दर दिल्यामुळे सहकारी साखर कारखान्यांना इन्कमटॅक्सच्या आलेल्या नोटीसा यासंदर्भात मार्ग काढण्यावर सकारात्मक चर्चा झाली, एकूणच सहकार उद्योगाला उर्जितावस्था व आत्मविश्वास देण्याचे अमित शहा यांनी सुचोवात केले. त्यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, राधाकृष्ण विखेपाटील, हर्षवर्धन पाटील, आ. रणजितसिंह मोहिते पाटील, आ. राहुल कुल, खा.धनंजय महाडीक, पृथ्वीराज देशमुख, मदन भोसले आदी महाराष्ट्रातील नेते उपस्थित होते.

या बैठकीनंतर माध्यमांना माहिती देताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, सहकारी साखर कारखानदारीला नवसंजीवनी मिळेल, असे अनेक निर्णय त्यात घेण्यात आले आहेत. एफआरपीपेक्षा अधिक पैसे देणार्‍या कारखान्यांच्या प्राप्तीकरासंदर्भातील काही प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा निघावा, अशी प्रमुख मागणी आम्ही केल्याचं फडणवीस यांनी म्हटलं. दरम्यान, केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांच्याकडून सकारात्मक आश्वासन मिळाल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.  इथेनॉल प्रकल्पाबाबत ऑईल कंपन्यांसोबत त्रिपक्षीय करार करून प्रश्न सोडविण्याची भूमिका सुद्धा केंद्र सरकारतर्फे घेण्यात आली, ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. कुठे दुष्काळ, कुठे अवकाळी आणि कोविडचा काळ यामुळे अनेक आर्थिक प्रश्न आहेत. त्यामुळे कर्जाच्या पुनर्गठनाबाबत सकारात्मक चर्चा झाली. कुठे दुष्काळ, कुठे अवकाळी आणि कोविडचा काळ यामुळे अनेक आर्थिक प्रश्न आहेत. त्यामुळे कर्जाच्या पुनर्गठनाबाबत सकारात्मक चर्चा झाली, असे फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान, फडणवीस यांनी अमित शहांसोबत बंद दाराआडही चर्चा केल्याची माहिती आहे.  

टॅग्स :Amit Shahअमित शाहDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसdelhiदिल्लीHome Ministryगृह मंत्रालयSugar factoryसाखर कारखाने