शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

महाआघाडीमध्ये नाही मोदींना हरवण्याची ताकद - अमित शाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2018 08:17 IST

2019 साली होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत  नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांकडून होत असलेल्या सर्वपक्षीय एकजुटीची भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी खिल्ली उडवली आहे.

नवी दिल्ली -  2019 साली होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत  नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांकडून होत असलेल्या सर्वपक्षीय एकजुटीची भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी खिल्ली उडवली आहे. मोदींविरोधात होत असलेल्या सर्वपक्षीय एकजुटीच्या कल्पनेचे अमित शाह यांनी स्वागत केले आहे.  तसेच विरोधी पक्षांकडून सरकारविरोधात आणण्यात येणाऱ्या अविश्वास प्रस्तावाबाबत बोलताना 300 हून अधिक खासदारांचे बळ असलेली एनडीए या प्रस्तावाला आरामात सामोरी जाईल, असे त्यांनी सांगितले.   नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाच्या झालेल्या पराभवानंतर भाजपाविरोधात विरोधी पक्षांची महाआघाडी स्थापन करण्याच्या शक्यतेला बळ मिळाले आहे. त्या पार्श्वभूमीवर अमित शाह म्हणाले, "एक काळ होता जेव्हा इंदिरा गांधींविरोधात संपूर्ण विरोधी पक्ष एकजूट होत असे. आता हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. आता मोदींविरोधात विरोधी पक्षांमध्ये एकजूट होत आहे." आजच्या घडीला देशातील 67 टक्के भागावर भाजपाचे राज्य आहे. याचाही त्यांनी पुनरुच्चार केला. वायएसआर काँग्रेस आणि तेलगू देसम पक्षाकडून आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी करत लोकसभेत दिलेल्या अविश्वास प्रस्तावाची नोटीस देण्यात आली आहे. मोदी सरकारविरोधात आणण्यात येत असलेल्या अविश्वास प्रस्तावावरही अमित शाह यांनी भाष्य केले. "एकीकडे विरोधी पक्ष सभागृहातील कामकाज होऊ देत नाहीत दुसरीकडे अविश्वास प्रस्तावाचे नोटीसही दिले जात आहे."हा प्रस्ताव इतक्या उशिराने का आणण्यात आला आहे. आम्ही अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाण्याची संपूर्ण तयारी केली आहे. सभागृहात नियमांनुसार मुद्द्यांवर चर्चा झाली पाहिजे. काँग्रेस आणि इतर पक्षांना पराभव डोळ्यासमोर दिसत आहे. त्यामुळेच ते सभागृहातील कामकाजामध्ये अडथळे आणत आहेत."असा टोला शाह यांनी लगावला.  

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाGovernmentसरकारNarendra Modiनरेंद्र मोदी