शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

Amit Shah vs Lalu Prasad Yadav: "लालू प्रसाद यांचं संपूर्ण आयुष्यात भांडणं लावण्यातच गेलंय.."; अमित शाह यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 16:29 IST

Bihar Politics, Nitish Kumar:"पंतप्रधानपदाच्या हव्यासापोटी नितीश यांनी भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला"

Amit Shah vs Nitish Kumar Lalu Prasad Yadav, Bihar Politics: नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या सरकारने बिहार विधानसभेत आपले बहुमत सिद्ध केले. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी फ्लोअर टेस्टवर बहिष्कार टाकला आणि सभागृहातून घोषणाबाजी करत बाहेर पडले होते. नितीश यांना २०२० मध्ये मुख्यमंत्री व्हायचे नव्हते, पण भाजपाने त्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला असा दावा त्यांनी स्वत:च त्यावेळी केला होता. त्यानंतर आज केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी नितीश कुमारांवर सडकून टीका केली. पंतप्रधान बनण्याच्या हव्यासापोटी नितीश यांनी भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला आणि लालू प्रसाद यांनी भांडणं लावली असा घणाघाती आरोप शाह यांनी केला.

अमित शहा यांनी बिहारमधील पूर्णिया येथे जनभावना रॅलीत संबोधित करताना राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दल प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यावर जोरदार निशाणा साधला. "पंतप्रधान होण्यासाठी नितीश कुमार यांनी भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसले आणि ते आज राजद आणि काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले आहेत. पण नितीश बाबू, भारतातील जनता आता जागरूक झाली आहे. स्वार्थाने आणि सत्तेच्या कुटील राजकारणाने कोणीही पंतप्रधान होऊ शकत नाही. विकासाची कामे करून, विचारधारेशी एकनिष्ठ राहून आणि देशाची सुरक्षा सुनिश्चित करून देशातील जनता एखाद्याला पंतप्रधान बनवते", असे अमित शाह म्हणाले.

"बिहारची भूमी नेहमीच परिवर्तन घडवून आणण्यात अग्रेसर राहिली आहे. भाजपशी गद्दारी करून नितीशजींनी स्वार्थ आणि सत्तेचे राजकारण दाखवून दिले. त्यांना सत्तेपासून दूर करण्याची सुरुवातही बिहारच्या भूमीतूनच होईल. आज मी सीमावर्ती जिल्ह्यात आलो आहे, त्यामुळे लालूजी आणि नितीशजींच्या पोटात दुखत आहे. मी बिहारमध्ये भांडणं लावण्यासाठी आलोय आणि जाताना काही तरी करूनच जाईन असा आरोप ते लोक करत आहेत. मला लालूजींना सांगावेसे वाटते की भांडणं लावण्यासाठी माझी गरज नाही. तुम्ही त्यासाठी पुरेसे आहात, कारण तुम्ही आयुष्यभर लोकांमध्ये भांडणं लावण्याचंच काम केलं आहे", अशा शब्दांत शाह यांनी लालू प्रसाद यादव यांच्यावरही टीकास्त्र सोडले.

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारAmit Shahअमित शाहLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादव