शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

अमित शाह म्हणतात, 2019 साली भाजपाला मिळणार 50 टक्क्यांहून अधिक मते 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2018 08:01 IST

एकापाठोपाठ एक राज्ये जिंकत चाललेल्या भाजपाला उत्तर प्रदेशमधील फुलपूर आणि गोरखपूर येथे झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागला होता. मात्र या पराभवातून सावरून भारतीय जनता पक्ष 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत दमदार कामगिरी करेल.

 नवी दिल्ली - एकापाठोपाठ एक राज्ये जिंकत चाललेल्या भाजपाला उत्तर प्रदेशमधील फुलपूर आणि गोरखपूर येथे झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागला होता. मात्र या पराभवातून सावरून भारतीय जनता पक्ष 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत दमदार कामगिरी करेल, असा भाजपाध्यक्ष अमित शाह यांना विश्वास आहे. निवडणुकीच्या तोंडावर सपा आणि बसपामध्ये ऐनवेळी झालेली आघाडी हे भाजपाच्या पराभवाचे मुख्य कारण होते. मात्र पक्ष पराभवाचे विश्लेषण करत असून, 2019 साली भाजपा 50 टक्क्यांहून अधिक मते मिळवून विजयी होईल, असा दावा त्यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी या निवडणुकीत झालेल्या भाजपाच्या पराभवाचे नेमके कारण सांगितले. "सपा आणि बसपामध्ये अखेरच्या क्षणी झालेल्या आघाडीमुळे फुलपूर आणि गोरखपूरमधील पोटनिवडणुकीत आम्हाला पराभव पत्करावा लागला. मात्र 2019 च्या निवडणुकीत सपा आणि बसपाची ही खेळी यशस्वी ठरणार नाही. भाजपाला दोन जागांवर पराभव पत्करावा लागल्याने काँग्रेसने  संसद भवन परिसरात मिठाई वाटल्याची चर्चा आहे. मात्र काँग्रेसकडून आम्ही 11 राज्यांमधील सत्ता खेचून घेतली याची चर्चा कुणीच करत नाही. त्रिपुराबाबतही कुणी बोलत नाही."असे ते म्हणाले. "पोटनिवडणुकांमध्ये स्थानिक मुद्दे अधिक प्रभावी असतात. पण सार्वत्रिक निवडणुका ह्या ज्येष्ठ नेते आणि मोठ्या मुद्द्यांवर लक्ष्य केंद्रित करून लढवल्या जातात याकडेही अमित शाह यांनी लक्ष वेधले. तसेच तेलगू देसम पक्षाने एनडीएला दिलेल्या सोडचिठ्ठीमुळे काहीही परिणाम होणार नसल्याचा दावा त्यांनी केला. "2014 साली 11 पक्ष एकत्र आले होते. त्यातील केवळ एका पक्षाने साथ सोडल्याने काहीही फरक पडणार नाही." असे त्यांनी सांगितले.  

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाElectionनिवडणूक