शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींनी टॅलेंटेड खेळाडू शोधले, त्यामुळे भारताने विक्रमी १०७ पदकं जिंकली - अमित शाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 17:26 IST

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ ने तमाम भारतीयांना जल्लोष करण्याची संधी दिली.

रोहतक : आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ ने तमाम भारतीयांना जल्लोष करण्याची संधी दिली. कधीच न करता आलेली कामगिरी भारतीय शिलेदारांनी केली अन् पदकांचे शतक झळकावले. २०१८ मध्ये भारताला सर्वाधिक ७० पदकं जिंकता आली होती. मात्र, यंदाच्या पर्वात भारतीय खेळाडूंनी मुसंडी मारताना पदकांची संख्या १०७ वर पोहचवली. प्रथमच एवढी पदकं भारताच्या वाट्याला आल्याने क्रीडा विश्वासह जगात तिरंग्याची शान वाढली. चीनच्या धरतीवर रंगलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या थरारानंतर भारतीय खेळाडू मायदेशी परतले आहेत. त्यांचे भारतात जोरदार स्वागत करण्यात आलं. विविध क्षेत्रातील दिग्गजांसह राजकीय नेतेमंडळी देखील या ऐतिहासिक क्षणाचा दाखला देत त्यांचे अभिनंदन करत आहेत. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारताच्या या यशाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिल्याचे दिसते. 

हरयाणातील रोहतक येथे बोलताना अमित शहा यांनी भारतीय खेळाडूचं अभिनंदन केलं. तसेच २०१४ नंतर भारत प्रत्येक खेळात पुढे जात असल्याचे त्यांनी नमूद केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, "भारतानं आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रथमच १०० हून अधिक पदकं जिंकली. २०१४ नंतर भारत प्रत्येक खेळात खूप चांगला खेळला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पंतप्रधान मोदी. कारण त्यांनी टॅलेंटेड खेळाडू शोधले, ज्यामुळे भारताला हे यश मिळालं. खेळाडूंच्या प्रशिक्षणाची व्यवस्था केली आणि त्यांच्या आहाराची तसेच आरोग्याची काळजी घेतली. यादरम्यान 'खेलो इंडिया' गेम चेंजर ठरला." 

 

दरम्यान, आशियाई क्रीडा स्पर्धेच्या ७२ वर्षांच्या इतिहासात बहुतांश वेळा भारताने १५ ते २५ पदकांची कमाई केली. मात्र, मागील चार आशियाई खेळांमध्ये भारत सातत्याने ५०+ पदके जिंकत आहे. गेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत (२०१८) भारताने प्रथमच ७० पदकं जिंकली होती. मात्र, यावेळी भारत मागील आकड्यांपेक्षा पुढे गेला असून विक्रमी १०७ पदके जिंकण्यात भारतीय शिलेदारांना यश आले. 

टॅग्स :Asian Games 2023आशियाई स्पर्धा २०२३Amit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत