शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

अमित शहांच्या रॅलीसाठी प्रत्येक मतदारसंघातून 1111 बाईक्स आणण्याचे टार्गेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 11:24 IST

कार्यकर्त्यांना वाटली भगवी हेल्मेटस्

हरियाणा: भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची 15 फेब्रुवारी रोजी हरियाणात होणारी रॅली सध्या देशभरात चर्चेचा विषय आहे. जिंद येथे होणाऱ्या रॅलीत एक लाख मोटारसायकल सहभागी होणार आहेत. त्यासाठी हरियाणातील स्थानिक भाजपा नेत्यांकडून प्रत्येक मतदारसंघातून किमान 1,111 बाईक्स आणण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. हरियाणात एकूण विधानसभा 90 मतदारसंघ आहेत. दरम्यान, या बाईक रॅलीत सहभागी होण्यापूर्वी कार्यकर्त्यांना वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार नाही, अशी शपथही घेण्यास सांगितल्याचे कळते. यासाठी पक्षाकडून कार्यकर्त्यांना टी-शर्टस, जॅकेटस आणि भगवे हेल्मेटसचे वाटप करण्यात आले आहे. त्यासाठी आम्ही 1,150 हेल्मेटस विकत घेतल्याची माहिती सोनपतमधील भाजप नेते राजीव जैन यांनी दिली. इतर मतदासंघातही या रॅलीसाठी जोरदार तयारी सुरू आहे. त्यासाठी स्थानिक नेत्यांकडून कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणावर टीशर्टस् वाटण्यात आले आहेत. हिसार जिल्ह्यातील एका नेत्याने कमळाचे चिन्ह असलेले तब्बल 10 हजार टी-शर्टस् विकत घेतल्याचे समजते. यापूर्वी राष्ट्रीय हरित लवादाकडून प्रदूषणाच्या मुद्द्यावरून या बाईक रॅलीवर आक्षेप घेण्यात आला होता. या रॅलीत तब्बल 1 लाख बाईक सहभागी होणार आहेत. परंतु, सध्या दिल्लीत प्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अशावेळी या बाईक रॅलीमुळे या प्रदूषणात आणखीनच भर पडेल. त्यामुळे या रॅलीतील मोटारसायकलींच्या संख्येवर निर्बंध घालावेत, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. त्यानंतर हरित लवादाकडून केंद्र सरकार आणि हरियाणा सरकारला नोटीस पाठवण्यात आली होती.

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपा