शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदींना पाठिंबा पण अमित शहांना विरोध, ममतांच्या वक्तव्यामुळे विरोधकांच्या गोटात संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2017 12:34 IST

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी), नोटाबंदी अशा विविध मुद्द्यांवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शेलक्या शब्दात टीका करणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या एका विधानाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

कोलकाता, दि. 20 - वस्तू आणि सेवा कर (जीएसटी), नोटाबंदी अशा विविध मुद्द्यांवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शेलक्या शब्दात टीका करणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या एका विधानाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. एका स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ममता बॅनर्जी यांनी मोदी यांना आपला पाठिंबा असला तरीही मी भाजपा अध्यक्ष अमित शहांच्या विरोधात असल्याचे सांगितले. ममता यांच्या या विधनामुळे विरोधकांच्या गोटात संभ्रम निर्माण झाला आहे. तर ममता बॅनर्जींनी आता मोदींचे धोरण स्वीकारल्याची चर्चा सुरु झाली आहे.एका स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ममता बॅनर्जींनी मोदींविरोधात नरमाईची भूमिका घेतल्याचे समोर आले आहे. या मुलाखतीत बॅनर्जी म्हणाल्या, मी मोदींचे समर्थन करते, पण अमित शहांना माझा विरोध आहे, मी पंतप्रधानांना जबाबदार ठरवत नाही. मी त्यांना का जबाबदार ठरवावं?, पण त्यांच्या पक्षाने जबाबदारीने वागले पाहिजे असे त्यांनी सांगितले. देशात हुकूमशाहीचे वातावरण असून एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष (अमित शहा) सरकारी कामात हस्तक्षेप करत आहे असा दावा त्यांनी यावेळी केला. ममता बॅनर्जींनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे कौतुक केले.  वाजपेयीदेखील भाजपचे नेते होते. पण ते संतुलित आणि निष्पक्ष नेते होते. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना आम्हाला कधीच अडचणींचा सामना करावा लागला नाही असे त्या म्हणाल्या.ही हुकूमशाहीच आहे- ममता बॅनर्जीअमित शहा यांना लक्ष करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, ह्यपक्षाचा अध्यक्ष केंद्रीय मंत्र्यांची बैठक घेतो. ही हुकूमशाहीच आहे, पक्षाचा अध्यक्ष मंत्र्यांची बैठक कशी घेऊ शकतो. पंतप्रधान कोण आहे?, मोदी की शहा असा सवालच त्यांनी उपस्थित केला. ममता बॅनर्जींनी मोदींचे धोरण स्वीकारल्याचे संकेत दिले असे भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे. तर मोदींचे समर्थन केल्याने विरोधकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.६ महिन्यांसाठी प्रतीक्षा करा, सर्व चित्र स्पष्ट होईलह्यविरोधी पक्षांमध्ये आता एकजूट झाली असून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रात बदल होईल. ६ महिन्यांसाठी प्रतीक्षा करा, सर्व चित्र स्पष्ट होईलह्ण असेही बॅनर्जींनी म्हटले आहे. केंद्र सरकारवर कोणी टीका केल्यास ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाचे पथक त्यांच्या घरात पोहोचते, असा आरोप देखील यावेळी ममता बॅनर्जी यांनी केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहBJPभाजपाAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेस