शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 22:07 IST

'पहिल्या चार टप्प्यातील 380 जागांपैकी 270 जागा मिळवून PM मोदींनी पूर्ण बहुमत मिळवले आहे. आता पुढील लढाई 400 पार करण्यची आहे.'

Amit Shah On CAA : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी(दि.14) पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील मतुआ समाजाचा बालेकिल्ला असलेल्या बनगाव येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले. यावेळी त्यांनी मतुआ समाजाच्या नागरिकत्वावरील चिंता दूर करण्याच्या प्रयत्न केला. शाहंनी त्यांना आश्वासन दिले की, या समाजाच्या सदस्यांना नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) अंतर्गत भारतीय नागरिकत्व दिले जाईल. 

जगातील कोणतीही शक्ती CAA रोखू शकत नाहीशाह यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर CAA बद्दल खोटा प्रचार आणि अफवा पसरवल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, सीएए केंद्राचा कायदा आहे, त्यामुळे ममता बॅनर्जी याची  अंमलबजावणी कधीच थांबवू शकत नाहीत. आमच्या निर्वासित बांधवांना भारताचे नागरिक होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, हीच मोदींचे गॅरंटी आहे. ममता बॅनर्जी यांनी लक्षात ठेवावं की, नागरिकत्व केंद्र सरकारच्या अधिकारात आहे, राज्य सरकारच्या नाही. काँग्रेस म्हणते की, ते सत्तेत आल्यावर सीएए रद्द करणार, पण याला जगातील कोणतीही शक्ती रोखू शकत नाही, असे शाह यांनी स्पष्टपणे सांगितले

ममता बॅनर्जी खोटं बोलत आहेतशाह पुढे म्हणाले की, ममता व्होट बँकेच्या राजकारणासाठी घुसखोरीला परवानगी देतात आणि सीएएला विरोध करतात. ममतांची व्होट बँक बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोर आहेत. ममता व्होट बँक खूश करण्यासाठी हिंदू निर्वासितांना नागरिकत्व देण्यास विरोध करत आहेत आणि घुसखोरांच्या समर्थनार्थ CAA विरोधात रॅली काढत आहेत. ममता बॅनर्जी सीएएबाबत खोटी माहिती पसरवत आहेत. माटुआ समाजातील लोकांना मी हमी देतो की, सीएएमुळए कोणालाही कोणतीही अडचण येणार नाही. तुम्हाला नागरिकत्व मिळेल आणि देशात सन्मानाने जगता येईल. 

30 जागा मिळताच ममतांचा काळ संपणार हावडा येथील एका जाहीर सभेत शाह यांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला आणि बंगालमधील तृणमूल काँग्रेसची भ्रष्टाचाराची राजवट फक्त भाजपच संपवू शकते असे सांगितले. शाह म्हणाले की, टीएमसी राजवटीत घुसखोरी, बॉम्बस्फोट, सिंडिकेट राजवट आणि अराजकतेमुळे बंगालमधील परिस्थिती वाईट आहे. बंगालला या परिस्थितीतून नरेंद्र मोदी आणि भाजपच वाचवू शकते. लोकसभा निवडणुकीत बंगालला 30 जागा मिळताच ममतांचा काळ संपेल. चिटफंड घोटाळा, शिक्षक भरती घोटाळा, पालिका भरती घोटाळा, रेशन घोटाळा, गुरे आणि कोळसा तस्करीत गुंतलेल्यांनी तुरुंगात जाण्याची तयारी ठेवा. एकाही भ्रष्टाचाऱ्याला सोडले जाणार नाही, असा इशाराही शाहंनी टीएमसीला दिला.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Amit Shahअमित शाहwest bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीcongressकाँग्रेस