अमित शहा म्हणजे ‘जनरल डायर’- केजरीवाल

By Admin | Updated: October 17, 2016 18:54 IST2016-10-17T18:54:21+5:302016-10-17T18:54:21+5:30

अरविंद केजरीवाल यांनी राज्यातील भाजप सरकारवर टीकेचा भडीमार केला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांवर टीका करताना केजरीवाल यांनी त्यांना ‘जनरल डायर’ म्हटलं.

Amit Shah means 'General Dyer' - Kejriwal | अमित शहा म्हणजे ‘जनरल डायर’- केजरीवाल

अमित शहा म्हणजे ‘जनरल डायर’- केजरीवाल

>ऑनलाइन लोकमत
 
सूरत, दि. 17 -आम आदमी पक्षाने रविवारी (दि. १६) गुजरातमध्ये होणा-या विधानसभा निवडणूकांच्या प्रचाराला सुरूवात केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राज्यातील भाजप सरकारवर टीकेचा भडीमार केला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांवर टीका करताना केजरीवाल यांनी त्यांना ‘जनरल डायर’ म्हटलं. 
 
पाटीदार आंदोलकांवर गोळीबार करण्याचे आदेश देणारे अमित शहा हे ‘जनरल डायर’ आहेत. तर, पटेल आरक्षणासाठी आंदोलन करणारा हार्दिक पटेल हा‘देशभक्त’ असल्याचे विधान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. अमित शहा यांच्या विरोधात जाणाऱ्यांचा आवाज चिरडला जातो,  अमित शहा हे गुजरातवर राज्य करतात, असं ते म्हणाले.
पाटीदार आंदोलन हिंसक झाल्यामुळे पोलिसांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात १४ युवक मारले गेले होते.

Web Title: Amit Shah means 'General Dyer' - Kejriwal