शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ममतांना धोबीपछाड देण्यासाठी अमित शाह शिकतायेत बंगाली भाषा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 21:06 IST

पश्चिम बंगालच्या निवडणुकीसाठी दीड वर्षाच्या जवळपासचा काळ शिल्लक आहे.

कोलकाता- पश्चिम बंगालच्या निवडणुकीसाठी दीड वर्षांच्या जवळपासचा काळ शिल्लक आहे. त्यामुळे निवडणुकीची रंगीत तालीम आतापासूनच सुरू झालेली आहे. ममता बॅनर्जींनी लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुकीसाठी आतापासून तयारी केली आहे. तर भाजपाही यात मागे नाही. भाजपाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असून, भाजपा 'मिशन 250' अंतर्गत पश्चिम बंगालमध्ये प्रचार करणार आहे.  निवडणुकीत भाषेची अडचण उद्भवू नये म्हणून अमित शाहसुद्धा बंगाली भाषा शिकत आहेत. त्यासाठी त्यांनी एका बंगाली शिक्षकाकडे शिकवणी सुरू केली आहे. विशेष म्हणजे ममता बॅनर्जी बंगाली भाषेतून लोकांशी संवाद साधतात. त्या तुलनेत भाजपाकडे बंगाली बोलणारं कोणतंही तगडं नेतृत्व नाही. त्याच अनुषंगानं शाह यांनी बंगाली भाषा शिकण्याचा पण केला आहे. जेणेकरून बंगाली भाषा समजणं आणि पश्चिम बंगालच्या सभांमध्ये भाषणांची सुरुवात निदान बंगाली भाषेतून करता येईल, अशी त्यांची मनीषा आहे.  ममता बॅनर्जी भाषणांमध्ये बऱ्याचदा भाजपाला बाहेरचे असे संबोधतात. अमित शाह यांना निवडणुकीच्या रणनीतीचे चाणक्य समजलं जातं. प्रत्येक निवडणुकीसाठी शाह वेगवेगळी रणनीती तयार करतात. महाराष्ट्र, हरियाणा निवडणुकीत चुकलेली रणनीती आणि झारखंडमध्ये पक्षाला स्वीकारावा लागलेल्या पराभवानंतर अमित शाहांना बंगालच्या निवडणुकीची धुरा सांभाळायची आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी आतापासूनच रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. 294 विधानसभेच्या जागा असलेल्या पश्चिम बंगालमध्ये भाजपानं 'मिशन 250'चं लक्ष्य निर्धारित केलं आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपानं जवळपास 42 जागांपैकी 18 जागांवर विजय मिळवला होता. तर तृणमूल काँग्रेसला 22 जागा मिळाल्या होत्या. तृणमूलला भाजपापेक्षा जास्त जागा मिळाल्या असल्या तरी पहिल्यांदाच भाजपानं बंगालमध्ये दोन आकडी जागा मिळवल्या होत्या.  

टॅग्स :Amit Shahअमित शहाwest bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपा