शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

'काँग्रेस आणि पाकिस्तानचा एकच अजेंडा', 370 च्या मुद्यावरुन अमित शाह यांची जोरदार टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 15:29 IST

Amit Shah in J&K : पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावरुन अमित शाह संतापले.

Amit Shah in J&K :जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कलम 370 च्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण तापले आहे. दरम्यान, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ वक्तव्यावरुन नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस भाजपच्या निशाण्यावर आले आहेत. यावरुन आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनीदेखील काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

देशविरोधी शक्तींसोबत काँग्रेसचा : अमित शहाअमित शाह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, 'पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांच्या बोलण्याने काँग्रेस पुन्हा एकदा एक्सपोज झाली आहे. काँग्रेस आणि पाकिस्तानचा हेतू आणि अजेंडा एकच आहे. गेल्या काही वर्षांपासून राहुल गांधी देशवासियांच्या भावना दुखावत सर्व भारतविरोधी शक्तींसोबत उभे आहेत. एअर स्ट्राईक आणि सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागणे असो किंवा भारतीय लष्कराबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणे असो, राहुल गांधींचा काँग्रेस पक्ष आणि पाकिस्तान नेहमीच एकाच बाजूने राहिले आहेत. पण, काँग्रेस आणि पाकिस्तान विसरले की, केंद्रात मोदी सरकार आहे, त्यामुळे काश्मीरमध्ये कलम 370 किंवा दहशतवाद परतणार नाही.'

काय म्हणाले पाकचे संरक्षण मंत्री?पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी तेथील एका टीव्ही छॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, 'कलम 370 पुन्हा लागू करण्याच्या मुद्द्यावरुन पाकिस्तान काँग्रेस आणिनॅशनल कॉन्फरन्ससोबत आहे. कलम 370 बाबत काँग्रेस आघाडीच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत. मला वाटतं, हे शक्य आहे. काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स या दोन्ही पक्षांची ताकद आहे. काश्मीरमधील लोकही या मुद्द्यावर खूप उत्सुक आहेत,' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

संबंधित बातमी-  जम्मू-काश्मीरच्या विनाशाला तीन कुटुंबे जबाबदार; श्रीनगरमधून PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

काँग्रेसचे मौन नॅशनल कॉन्फरन्सने सत्तेत आल्यास कलम 370 पुनर्स्थापित करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला असला तरी, काँग्रेसने अद्याप यावर कोणतेही वक्तव्य केलेले नाही. जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्याचे आश्वासन दिले असले तरी काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात या मुद्द्याचा उल्लेख केलेला नाही.

ओमर अब्दुल्ला यांचे पाकला प्रत्युत्तर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी कलम 370 वर पाकिस्तानी नेत्याच्या टिप्पणीला जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, 'पाकिस्तानने आधी स्वत:ची काळजी घ्यावी. त्यांनी आमच्या निवडणुकीवर भाष्य करू नये. आमचा पाकिस्तानशी काय संबंध, आम्ही पाकिस्तानचा भाग नाही. जम्मू-काश्मीरचा मुद्दा हा भारताचा अंतर्गत विषय असून त्यात हस्तक्षेप करण्याचा पाकिस्तानला अधिकार नाही.'

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाJammu Kashmirजम्मू-काश्मीरElectionनिवडणूक 2024congressकाँग्रेस