शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

Amit Shah In Baramulla:'पाकिस्तानसोबत कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नाही', काश्मीरमधून अमित शहांची स्पष्टोक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2022 14:57 IST

Amit Shah In Baramulla: 'गुपकर मॉडेल तरुणांच्या हातात दगड आणि बंदुका देत आहे. मोदींच्या मॉडेलमुळे विकास आणि रोजगार मिळतोय.'

Amit Shah In Baramulla: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी आज दसऱ्याच्या दिवसी जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला येथे एका रॅलीला संबोधित केले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात भारत-पाकिस्तान संबंधांवर भाष्य केले. 'पाकिस्तानसोबत कोणत्याही प्रकारची चर्चा केली जाणार नाही', अशी स्पष्टोक्ती त्यांनी दिली. तसेच, 'जो परिसर पूर्वी दहशतवादी हॉटस्पॉट होता, तो आता पर्यटनाचा केंद्रबिंदू बनला आहे. वाढत्या पर्यटनामुळे येथील अनेक तरुणांना रोजगार मिळतोय,' असेही ते म्हणाले. 

'मोदींच्या मॉडेलमुळे विकास'पंतप्रधान मोदींचे कौतुक करताना गृहमंत्री म्हणाले, 'गेली 70 वर्षे मुफ्ती आणि कंपनी, अब्दुल्ला यांचा मुलगा येथे सत्तेत होते. परंतू, त्यांनी 1 लाख बेघर लोकांना घरे दिली नाहीत. मोदीजींनी 2014-2022 दरम्यान या 1 लाख लोकांना घरे दिली. मोदीजींच्या मॉडेलमुळे विकास आणि रोजगार मिळतो. तर गुपकर मॉडेल तरुणांच्या हातात दगड आणि बंदुका देत आहे. मोदींच्या मॉडेलमध्ये आणि गुपकरांच्या मॉडेलमध्ये खूप फरक आहे.' 

'जम्हूरियत गावागावात नेण्याचे काम मोदींनी केले'जम्मू-काश्मीरमध्ये जम्हूरियत गावागावात नेण्याचे पहिले काम मोदीजींनी केले आहे. यापूर्वी काश्मीरमध्ये जमहूरियतची व्याख्या तीन कुटुंबे, 87 आमदार आणि 6 खासदार अशी होती. 5 ऑगस्टनंतर मोदीजींनी जम्मू-काश्मीरमधील जम्मूरियतला जमिनीवर, गावापर्यंत नेण्याचे काम केले आहे. आज खोऱ्यात आणि जम्मू-काश्मीरमध्ये 30 हजारांहून अधिक लोक पंचायत, तहसील पंचायतींचे नेतृत्व करत आहेत.

'लवकरच पारदर्शकतेने निवडणुका होतील'अमित शाह पुढे म्हणाले, 'मतदार यादी तयार करण्याचे काम पूर्ण होताच जम्मू-काश्मीरमध्ये पूर्ण पारदर्शकतेने निवडणुका होतील.काही दिवसांपूर्वी मी मेहबुबा मुफ्ती यांचे एक ट्विट वाचले होते की, गृहमंत्री येत असाल तर काश्मीरला काय दिले याचा हिशेब विचारा. जम्मू-काश्मीरला आपण काय दिले, याचा हिशेब मी देतो, पण अनेक दशकांपासून तीन कुटुंबांनी जम्मू-काश्मीरवर राज्य केले, त्यांनी काय दिले, त्याचाही हिशेब त्यांनी द्यावा.

'मोदीजींना पाठिंबा देण्यासाठी आले आहेत'याशिवाय आपल्या कार्यक्रमावर बोलताना ते म्हणाले की, 'येथे रॅली काढण्याची योजना आखली असता, काही लोकांनी बारामुल्लाचा कार्यक्रम ऐकण्यासाठी कोण येणार? असे म्हटले होते. मला आज त्यांना सांगायचे आहे की, या कार्यक्रमात काश्मीरच्या या सुंदर खोऱ्यातील हजारो लोक विकासाची कहाणी ऐकण्यासाठी आणि मोदीजींना पाठिंबा देण्यासाठी आले आहेत.' 

टॅग्स :Amit Shahअमित शाहJammu Kashmirजम्मू-काश्मीरBJPभाजपा