शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Amit Shah in Gujrat: अमित शाह रातोरात गुजरातमध्ये आले, पहाटे दिल्लीत गेले; दोन दिवस आधी काय घडले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 10:07 IST

Amit Shah role on Vijay Rupani's resignation: विजय रुपाणी यांनी राजीनामा देण्याच्या एक महिना आधी रुपाणी सरकारने महोत्सव साजरा केला होता. त्यानंतर एका महिन्यातच रुपाणींची उचलबांगडी केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

अमित शाहंचे (Amit Shah) एकदम खास असलेले गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी (Vijay Rupani) यांनी काल अचानक राजीनामा दिल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. आता नवा मुख्यमंत्री कोण होणार, कोणाला मंत्रिपदातून डच्चू मिळणार याची चर्चा जोरात होऊ लागलेली असताना यामागे अमित शहांचीच खेळी असल्याचे समोर येत आहे. (Why Amit Shah came In Gujrat overnight two days back? Vijay Rupani's resignation row.)

विजय रुपाणी यांनी राजीनामा देण्याच्या एक महिना आधी रुपाणी सरकारने महोत्सव साजरा केला होता. त्यानंतर एका महिन्यातच रुपाणींची उचलबांगडी केल्यामुळे खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे नेते परेश धानानी यांनी यावर बोट ठेवले आहे. जर महिनाभरापूर्वीच रुपाणी सरकारच्या यशाचा महोत्सव साजरा केला तर मग आता चेहरा बदलण्याची गरज का पडली, असा सवाल केला आहे. रुपाणी अपयशी ठरले त्यांचे अपयश झाकण्यासाठी भाजपाने हे सारे रचले आहे, असा आरोप त्यांनी केला. 

विजय रुपाणी हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे एकदम विश्वासातील नेते. मात्र, तरीदेखील रुपाणी यांना राजीनामा द्यावा लागणे हे एक कोडे बनले आहे. सूत्रांनुसार अमित शाह हे दोन दिवसांपूर्वी अचानक रात्रीच्या सुमारास गुजरातला आले होते. यानंतर लगेचच सकाळी दिल्लीला रवाना झाले. यावेळी त्यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली, यामध्येच रुपाणी यांच्या राजीनाम्याचा निर्णय घेण्यात आला. गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीला अजून एक वर्ष बाकी आहे. अशा वेळी सत्ताबदलाबाबत राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

विजय रुपानी यांच्यानंतर गुजरातचे नवे मुख्यमंत्री कोण? आज भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक

विजय रुपानी यांच्या नेतृत्वाबद्दल गुजरातमधील पटेल समाजात नाराजी होती. त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी विधानसभा निवडणुकांत भाजपाला विजय मिळणे शक्य नाही, हे स्पष्ट दिसत होते. तसेच, त्यांना गुजरातमधील कोरोना स्थिती नीट हाताळ‌ता आली नाही. या तीन महत्वाच्या कारणांमुळे गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून विजय रुपानी यांना हटविण्यात आले, अशी शक्यता आता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शाहVijay Rupaniविजय रूपाणीBJPभाजपाGujaratगुजरात