शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

अमित शहा मंत्रिमंडळात; राजनाथ नंबर दोनवर कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 06:19 IST

शानदार शपथविधी समारंभ :अर्थमंत्रीपदी कोण याची चर्चा

संतोष ठाकूर नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा दुसऱ्यांदा शपथविधी झाला. राष्ट्रपती भवनातील फोरकोर्ट येथे गुरुवारी पंतप्रधान आणि त्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला. या शानदार शपथविधी समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत २४ कॅबिनेट, नऊ राज्यमंत्री (स्वतंत्र पदभार) आणि २४ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. शपथ घेणाऱ्यांत सर्वांत आश्चर्यकारक नाव अमित शहा यांचे होते. वरिष्ठत्वानुसार तिसऱ्या क्रमांकावर त्यांचा शपथविधी झाला. ते देशाचे अर्थमंत्री असतील, असे बोलले जाते.

प्रकृती ठीक नसल्याने मंत्रीपद देऊ नये, असे अरुण जेटली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राने कळविले होते. त्यामुळे भावी अर्थमंत्री कोण असतील? अशी चर्चा होती. पीयूष गोयल यांनी वित्तमंत्रालयाचा अतिरिक्त पदभार सांभाळलेला असल्याने वित्तमंत्रीपदासाठी त्यांच्या नावाचीही चर्चा होती. अर्थमंत्री म्हणून अमित शहा यांचेही नाव चर्चेत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर राजनाथ सिंह यांनी शपथ घेतली. त्यानुसार तेच पुन्हा गृहमंत्री होतील, असे स्पष्ट संकेत मिळतात.

गृहमंत्रीपद हे सरकारमधील दुसऱ्या क्रमांकांचे पद मानले जाते. तथापि, दोन नंबरच्या पदासंदर्भातील चर्चेदरम्यान सरकारने त्याचवेळी स्पष्ट केले होते की, पंतप्रधान सरकारचे प्रमुख असतात आणि यात नंबर दोन किंवा तीन कोणी नसते.मनेका आणि वरुण मंत्रिमंडळात नसतीलमनेका गांधी यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला नाही. काँग्रेस आणि गांधी परिवाराविरुद्ध भाजप आक्रमक असल्याने त्यांना नंतर सरकारमध्ये सामील केले जाऊ शकते. एकाच परिवारातील दोघांना निवडणुकीचे तिकिट देण्याचा नियम शिथिल करून मनेका गांधी आणि वरुण गांधी यांना तिकिट देण्यात आले. तथापि, सरकारमध्ये सामील केले जाणार नाही, याच शर्तीवर त्यांना तिकिट देण्यात आले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाRajnath Singhराजनाथ सिंहpm modi swearing-in ceremonyनरेंद्र मोदी शपथविधी