"काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वारंवार होणाऱ्या पराभवामुळे आताच थकून जाऊ नये, कारण आगामी काळात बंगाल आणि तामिळनाडूमध्येही त्यांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागणार आहे," अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राहुल गांधींना टोला लगावला. अहमदाबाद महानगरपालिकेच्या ३३० कोटी रुपयांच्या विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी शहा यांनी २०२९ च्या लोकसभा निवडणुकीबाबतही मोठे भाष्य केले.
देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना अमित शहा म्हणाले की, "२०२९ मध्ये भारतीय जनता पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा सत्तेत येईल. भाजपची तत्त्वे आणि जनतेशी असलेले नाते इतके घट्ट आहे की, देशाचा विकास रथ कोणीही रोखू शकणार नाही."
अमित शहा यांनी आपल्या भाषणात काँग्रेसच्या विरोध करण्याच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत टीका केली. राम मंदिर उभारणी असो किंवा पाकिस्तानवर केलेला सर्जिकल स्ट्राईक, काँग्रेसने प्रत्येक वेळी विरोधच केला. काश्मीरमधील कलम ३७० हटवणे आणि मुस्लिम भगिनींसाठी तिहेरी तलाक रद्द करण्याच्या निर्णयालाही काँग्रेसने कडाडून विरोध केला. समान नागरी कायदा आणि बांगलादेशी घुसखोरांना हटवण्याच्या मोहिमेतही काँग्रेसने आडकाठी आणली, असेही अमित शहा म्हणाले.
"राहुल गांधींना समजवणे माझ्या क्षमतेबाहेर"
अमित शहा म्हणाले की, "जनता ज्या गोष्टींचे समर्थन करते, नेमका त्यालाच राहुल गांधी आणि काँग्रेस विरोध करतात. ज्या नेत्याला त्यांचा स्वतःचा पक्ष नीट समजू शकला नाही, त्यांना समजवण्याची क्षमता माझ्यात नाही. अशा नकारात्मक भूमिकेमुळे त्यांना जनतेची मते कशी मिळतील?" असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
Web Summary : Amit Shah taunted Rahul Gandhi, saying he shouldn't tire of defeats yet, as more are coming in Bengal and Tamil Nadu. He predicted BJP's 2029 victory under Modi and criticized Congress's opposition to key decisions like Ram Mandir and Article 370 repeal. Shah questioned Rahul's understanding, highlighting Congress's negative stance.
Web Summary : अमित शाह ने राहुल गांधी पर तंज कसते हुए कहा कि उन्हें अभी हार से थकना नहीं चाहिए, क्योंकि बंगाल और तमिलनाडु में और हार आनी बाकी है। उन्होंने मोदी के नेतृत्व में बीजेपी की 2029 की जीत की भविष्यवाणी की और राम मंदिर और अनुच्छेद 370 निरस्तीकरण जैसे प्रमुख फैसलों के विरोध के लिए कांग्रेस की आलोचना की। शाह ने राहुल की समझ पर सवाल उठाते हुए कांग्रेस के नकारात्मक रुख पर प्रकाश डाला।