शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

ओवेसींना भाजपनं बंगालच्या निवडणुकीत उभं केलं? अमित शाहंनी स्वतःच सांगितलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 14:37 IST

आम्ही आमची तयारी करत आहोत. बंगालच्या जनतेला आमच्यासोबत जोडत आहोत. यासाठी प्रयत्न करत आहोत. मला विश्वास आहे, की बंगालमध्ये आम्हाला 200 हून अधिक जागा मिळतील आणि पूर्ण बहुमताचे सरकार बनेल.'

नवी दिल्ली -पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) सध्या निवडणुकीचे वातावरण तापलेले आहे. निवडणुकांची तारीख जाहीर होण्यापूर्वीच अमित शाहंपासून (Amit Shah) ते ममता बॅनर्जींपर्यंत सर्वच नेत्यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. या निवडणुकीत ममता बॅनर्जी आणि भाजप थेट आमनेसामने आहेत. भाजप आणि तृणमूल काँग्रेस एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. यातच, खरे तर असदुद्दीन ओवेसी बंगालमद्ये येत नाहीत, तर त्यांना भाजपच येथे घेऊन येत आहे, असा आरोप ममता बॅनर्जी सातत्याने करत आहेत. आता याला भाजप नेते अमित शाह यांनी स्वतःच उत्तर दिले आहे. (Amit Shah on aimim asaduddin owaisi in west bengal election)

याच मुद्द्यावर एका वृत्त संस्थेशी बोलताना गृहमंत्री अमित शाह म्हणाले, 'यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. देशाच्या संविधानात प्रत्येक राजकीय पक्षाला प्रचार करण्याचा अधिकार आहे. मग मते देणे अथवा न देणे हा जनतेचा अधिकार आहे.'

शरणार्थ्यांना CAA अंतर्गत केव्हापासून मिळणार नागरिकत्व? अमित शाह यांनी केलं मोठं वक्तव्य

200हून अधिक जागा जिंकण्याचा दावा -अमित शाह यांनी बंगालच्या निवडणुकीत 200हून अधिक जागा जिंकण्याचा दावा केला आहे. निवडणुकीपूर्वी युती संदर्भातील एका प्रश्नावर शाह म्हणाले, 'सर्वच पक्ष स्वतत्र आहेत. त्यांना आपली युती कुणासोबत करायची, निवडणूक कशी लढायची, हे बघायचे आहे. आम्ही आमची तयारी करत आहोत. बंगालच्या जनतेला आमच्यासोबत जोडत आहोत. यासाठी प्रयत्न करत आहोत. मला विश्वास आहे, की बंगालमध्ये आम्हाला 200 हून अधिक जागा मिळतील आणि पूर्ण बहुमताचे सरकार बनेल.'

पश्चिम बंगालमध्ये भाजप ममतांना थेट टक्क देत आहे. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि डावे एकत्रितपणे निवडणूक लढवत आहेत. राज्यात सत्ताधारी टीएमसीचा खरा सामना भाजप आणि काँग्रेस-डाव्या आघाडीशी आहे. येथे एप्रिल-मे महिन्यात निवडणुका होऊ शकतात. यासाठी सर्वच पक्ष सातत्याने प्रचार करताना दिसत आहेत.

निवडणूक संपता-संपता ममता दीदीही म्हणतील 'जय श्रीराम', बंगलामध्ये दिसला अमित शाहंचा रुद्रावतार

निवडणूक संपता-संपता ममता दीदीही म्हणतील 'जय श्रीराम' - केंद्रीय गृह मंत्री अमित शाह म्हणाले, बंगालमध्ये ममता बॅनर्जी या गुंडांच्या बळावर निवडणूक जिंकतात. बंगलामध्ये जय श्री राम म्हणायचे नाही, तर पाकिस्तानात म्हणणार का? निवडणूक संपता-संपता ममता बॅनर्जी देखील जय श्रीराम म्हणायला लागतील. ममता बॅनर्जी केवळ एका समाजाची मते घेण्यासाठीच असे करतात. यावेळी ते म्हणाले हिंदुस्तानात प्रत्येक धर्माचा आदर होईल. 

टॅग्स :Amit Shahअमित शहाMamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालtmcठाणे महापालिकाBJPभाजपा