शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

अमित शहांच्या हस्ते पक्षाच्या कम्युनिटी हॉलचे उद्घाटन, 'त्या' व्हायरल मेसेजमुळे नागरिकांमध्ये नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 14:28 IST

Amit Shah Ahmedabad Visit: शहा वेजापूर परिसरातील नुकत्याच बांधण्यात आलेल्या कम्युनिटी हॉलचे उद्घाटन करतील

ठळक मुद्देमेसेज व्हायरल झाल्यानंतर नागरिकांकडून प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे

अहमदाबाद: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज अहमदाबादच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते वेजापूर परिसरातील नुकत्याच बांधण्यात आलेल्या पक्षाच्या कम्युनिटी हॉलचे उद्घाटन केले. अमित शहांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर एक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्या मेसेजमध्ये पोलिसांकडून वेजापूर परिसरातील नागरिकांना घराची दारं-खिडक्या बंद ठेवण्याचे आदेश दिल्याचे सांगितले जात आहे.

नागरिकांमध्ये नाराजीवेजापूर परिसरात हा मेसेज व्हायरल झाल्यानंतर नागरिकांकडून प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्या मेजेसमध्ये वेजापूर परिसरातील सोसाटींना पत्र लिहून घराची दारं-खिडक्या बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, आदेशाचे पालन न केल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला.

सत्य काहीतरी वेगळेचआमच्या पडताळणीत समोर आले की, पोलिसांनी वेजापूर परिसरातील स्वामीनारायण आणि स्वातीसह काही सोसाटींना पत्र लिहीले आहे. त्यात अमित शहांना झेड प्लस सिक्योरिटी असल्याचे सांगितले आहे. तसेच, शहा व्हीव्हीआयपी व्यक्ती असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी हा आदेश जारी करण्यात आला. पण, या आदेशाचे पत्र संपूर्ण परिसरासाठी नसून, उद्घाटन होणाऱ्या हॉलच्या परिसरातील सोसायटींसाठीच आहे. तसेच, आदेशाचे पालन न केल्यास कारवाई होईल, असे या पत्रात नमुद केलेले नाही.  मात्र, सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत लोकांना दारं-खिडक्या बंद ठेवण्याची ताकीद देण्यात आली होती. 

टॅग्स :Amit Shahअमित शहाBJPभाजपाahmedabadअहमदाबाद