शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

बिटकॉईनद्वारे करोडो रूपयांचा गंडा घालणारा अटकेत, अमित भारद्वाजला दिल्ली विमानतळावर अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2018 9:29 AM

आभासी चलन बिटकॉइनसाठी देशातील सुमारे ८ हजार जणांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणातील प्रमुख आरोपी अमित भारद्वाज याला दिल्ली विमानतळावर अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिली़.

पुणे- आभासी चलन बिटकॉइनसाठी देशातील सुमारे ८ हजार जणांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणातील प्रमुख आरोपी अमित भारद्वाज याला दिल्ली विमानतळावर अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिली. बिटकॉईन फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी अमित भारद्वाज व त्याचे दोन भाऊ यांच्यावर गुन्हा दाखल होण्यापूर्वीच परदेशात फरार झाल्याचे बोलले जात होते. त्यांना अटक करण्यासाठी पुणे पोलिसांनी रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी चार पथके नेमण्यात आली आहेत. एका वृत्तानुसार अमित भारद्वाज याला बँकॉक येथे ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले.याबाबत रश्मी शुक्ला यांनी सांगितले की, आपण सर्व तपास यंत्रणांना याबाबत माहिती कळविली होती़ अमित भारद्वाज याला दिल्ली विमानतळावर पकडण्यात आल्याचे केंद्रीय तपास यंत्रणांनी माहिती दिली आहे़ पुणे पोलीस त्याला लवकरच ताब्यात घेतील. बिटकॉईन फसवणूक प्रकरणात आतापर्यंत देशभरात तीन गुन्हे दाखल असून त्यातील दोन गुन्हे निगडी व दत्तवाडी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करणाऱ्या १५ देशांतील ८४ हजार गुंतवणुकदारांची फसवणूक झाली असून त्यातून ७ लाख बिटकॉईनमध्ये सुमारे ३५ हजार कोटी रुपयांची गुंतवणुक झाल्याचे तपासात आढळले आहे़  बिटकॉईन खरेदीतून आकर्षक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांना करोडो रुपयांचा गंडा घालणाºया ८ जणांना सायबर क्राईम सेलने अटक केली आहे.  या प्रकरणात आतापर्यंत पुण्यातील एकूण २५ जणांची २ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी सायबर क्राईम सेलकडे आल्या आहेत़ पोलिसांनी आतापर्यंत अंदाजे ३२ बिटकॉईन, ७९९९ इथर व ३८ लाख ९६ हजार रुपये रोख जप्त केले आहेत़ याशिवाय १६० बिटकॉईन, ३ लाख एमकॅप, ८० हजार इथर तपासात निष्पन्न झाले असून ते पोलिसांनी वॉलेटमध्ये हस्तांतरित केले आहे. आकाश कांतिलाल संचेती (वय २७, रा़ मुकुंदनगर), काजल जितेंद्र शिंगवी (वय २५, रा़ महर्षीनगर), व्यास नरहरी सापा (वय ४६, रा़ भवानी पेठ), हेमंत विश्वास सूर्यवंशी (वय ५१, रा़ बाणेर), हेमंत बाबासाहेब चव्हाण (४७, रा़ साडेसतरानळी, हडपसर), अजय तानाजी जाधव (वय २१, रा़ जनकपुरी, दिल्ली), पंकज श्रीनंदकिशोर आदलाखा (वय ४०, रा़ दिल्ली), हेमंत चंद्रकांत भोपे (वय ४६, रा़ डीएसके विश्व, धायरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. बिटकॉईन गुंतवणुकीतून फसवणूक केल्याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेता अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. त्यांनी दिल्लीतून पंकज आदलाखा यास अटक करीत त्याच्या इतर साथीदारांना अटक केली. त्यांनी मल्टीलेव्हल मार्केटिंगच्या माध्यमातून २ कोटी २५ लाखांची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.सिंगापूर येथे गेन बिटक्वॉईन ही कंपनी आहे़ ही जीबी २१ या मुख्य कंपनीची उपकंपनी आहे़ बिटकॉईन कंपनीमध्ये १ बिटकॉईन गुंतवणुकीवर दरमहा ०.१ टक्के बिटक्वॉईन याप्रकारे १८ महिन्यांत १.८ बिटक्वॉईन परतावा देण्याचे आमिष दाखविले. हेमंत भोपे हा पुण्यातील इन्व्हेस्टमेंट सही या कंपनीमार्फत इन्व्हेस्टमेंट कशी आणि कोठे करावी, याचे सेमिनार घेत असे़ त्यातून निर्माण झालेल्या जनसंपकार्चा फायदा घेत त्याने अनेकांना गेन बिटकॉईनमध्ये चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणुकीस भाग पाडले आहे़ पंकज आदलाखा हा दिल्लीचा राहणारा असून, तो मोटीव्हेशनल स्पीकर म्हणून कार्यरत असताना त्याने अनेक एमएलएम कंपन्यांसाठी मार्केटिंग व ट्रेनिंग घेतल्याचे समोर आले आहे़ गेन बिटकॉईन कंपनीच्या योजनेच्या प्रचारासाठी त्याने पुणे, मुंबई, दिल्लीसह देशातील अनेक शहरांमध्ये तसेच दुबई येथे गेन बिटकॉईनतर्फे सेमिनार घेऊन लोकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले आहे़बिटकॉईनमध्ये परतावा न देता बाजारात काहीएक किंमत नसलेले आरोपींच्या कंपनीचे गेन बिटकॉईनन स्वत: तयार केलेले क्रिप्टो एमकॅप मार्फत परतावा दिल्याचे भासवून लोकांची करोडो रुपयांची फसवणूक केली आहे़ही कारवाई पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, आर्थिक व सायबर सेलचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ व त्यांच्या सहकाºयांनी केली आहे़

काय आहे बिटकॉईन?बिटकॉईन ही (क्रिप्टोकरन्सी) आभासी चलन आहे, ते दृश्य नाही. मात्र, ऑनलाईन माध्यमातून ई-बॅलेन्स स्वरूपात दिसते. त्यावर कोणत्याही शासकीय यंत्रणेचे नियंत्रण नाही. एक बिटकॉईनचे मूल्य सुमारे ५ लाख इतके आहे. तर, एमकॅपचे मूल्य १३ रुपये आहे़ अशाप्रकारे गुंतवणूक करून फसवणूक केल्याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात १९, तसेच निगडी पोलिसांत ८ अशा एकूण २७ तक्रारी आल्या आहेत. तक्रारींचा आकडा शंभरी पार करू शकतो. फसवणूक झालेल्यांनी सायबर सेल शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्तप्रदीप देशपांडे यांनी केले आहे.