शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
5
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
6
Operation Sindoor Live Updates: भारताचा कोणताही शत्रू वाचू शकत नाही, अमित शाहांची पोस्ट
7
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
8
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
9
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
11
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
12
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
13
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
14
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
15
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
16
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
17
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
18
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
19
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
20
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?

हवाई दलाचे 'पंख' आणखी मजबूत होणार; मोदी सरकार 114 विमानांची खरेदी करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 10:26 IST

हवाई दलासाठी लवकरच 1.4 लाख कोटी रुपयांचे करार

नवी दिल्ली: राफेल डीलवरुन मोदी सरकारला काँग्रेससह विरोधकांनी लक्ष्य केलं आहे. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारनं आणखी 114 लढाऊ विमानांची खरेदी करण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी तब्बल 20 अब्ज डॉलर म्हणजेच 1.4 लाख कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मोदी सरकारनं राफेल विमानांच्या खरेदीसाठी फ्रान्समधील डसॉल्ट कंपनीशी 59 हजार कोटींचा करार केला. मात्र या विमानांसाठी सरकारनं अधिक किंमत मोजल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केला आहे. राहुल यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केंद्र सरकार अडचणीत सापडलं आहे. संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांच्या अध्यक्षतेखालील सुरक्षा अधिग्रहण परिषदेकडून या महिन्याच्या शेवटपर्यंत किंवा पुढील महिन्याच्या सुरुवातीला विमान खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली जाऊ शकते. या करारामुळे पुढील तीन ते पाच वर्षांमध्ये 18 लढाऊ विमानं भारतीय सैन्याला मिळतील. तर उर्वरित विमानांची निर्मिती भारतात केली जाईल. मेक इन इंडियाच्या अंतर्गत या विमानांची उभारणी करण्यात येणार आहे. भारतीय सैन्याला युद्धसज्ज करण्याच्या दृष्टीनं 114 विमानांच्या खरेदीचा करार अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. या कराराच्या अंतर्गत रशियाकडून सुखोई-35 विमानं खरेदी करण्यात येतील. यासोबतच एफ/ए-18, एफ-16 (अमेरिका), ग्रिपेन-ई (स्वीडन), मिग-35 (रशिया), युरोफायटर टायफून ही विमानं भारताकडून खरेदी केली जाऊ शकतात. या विमानांनी भारतीय संरक्षण मंत्रालयाकडे निविदा भरल्या आहेत. चीन आणि पाकिस्तानच्या कुरापती लक्षात घेता या विमानांची खरेदी लवकरात लवकर पूर्ण व्हावी, यासाठी हवाई दल आग्रही आहे. मात्र संरक्षण करारांची पूर्तता आणि अधिग्रहणासाठी होणारा विलंब पाहता यासाठीही वेळ लागण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलPakistanपाकिस्तानchinaचीनRafale Dealराफेल डील