शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

अमेठी सिंगापूर बनली का? स्मृती इराणींचा राहुल गांधींना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 16:55 IST

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज आपल्या पारंपरिका अमेठी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आरोप प्रत्यारोपांनाही उत आला आहे.

अमेठी - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज आपल्या पारंपरिका अमेठी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आरोप प्रत्यारोपांनाही उत आला आहे. अमेठीला सिंगापूर बनवू असा वारंवार दावा करणाऱ्या राहुल गांधींना स्मृती इराणी यांनी टोला लगावला आहे. अमेठी सिंगापूर बनली का? असा सवाल त्यांनी राहुल गांधींना विचारला आहे.  राहुल गांधी हे अमेठी मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. दरम्यान, आज नामांकन दाखल करण्यापूर्वी राहुल गांधी यांनी मोठा रोड शो करून शक्तिप्रदर्शन केले. यावेळी त्यांची बहीण प्रियंका गांधी, भाओजी रॉबर्ट वाड्रा आणि भाचा रिहान आणि भाची मिराया हेसुद्धा उपस्थित होते. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यावेळी दोन मतदारसंघांमधून निवडणूक लढवत असून, काही दिवसांपूर्वीच त्यांनी वायनाड येथून उमेदवारी अर्ज दाखल केला होता.  दरम्यान, अमेठी लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी यांना आव्हान देणाऱ्या  स्मृती इराणी या गुरुवारी आपल्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत. ''राहुल गांधी यांनी अमेठीतील जनतेची फसवणूक केली आहे. भाजपाच्या गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात अमेठीमध्ये विकास कामे झाली आहेत. इथे जो काही विकास झाला आहे तो भाजपामुळे झाला आहे.''असा दावा स्मृती इराणी यांनी केला आहे. आपण अमेठी सोडून जाणार नाही. येथील जनतेची लढाई त्यांच्यासोबत राहूनच लढू असा टोलाही स्मृती इराणी यांनी लगावला.  राहुल गांधी हे 2004 मध्ये प्रथमच अमेठी मतदारसंघातून निवडून आले होते. तेव्हापासून ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.  2004 आणि 2009 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी सहजपणे विजय मिळवला होता. मात्र 2014 मध्ये स्मृती इराणी यांनी राहुल गांधींसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSmriti Iraniस्मृती इराणीRahul Gandhiराहुल गांधीamethi-pcअमेठीUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसBJPभाजपा