11 अब्ज डॉलर्स खचरूनही अमेरिकी ‘हायस्पीड रेल्वे’ रुळापासून दूरच
By Admin | Updated: August 8, 2014 02:26 IST2014-08-08T02:26:16+5:302014-08-08T02:26:16+5:30
हायस्पीड प्रवासी रेल्वे सुरू करण्यासाठी अमेरिकेने 2क्क्9 पासून 11 अब्ज डॉलर्स खचरूनही हा प्रकल्प कुठेही मूळ धरताना दिसत नाही.

11 अब्ज डॉलर्स खचरूनही अमेरिकी ‘हायस्पीड रेल्वे’ रुळापासून दूरच
>वॉशिंग्टन : हायस्पीड प्रवासी रेल्वे सुरू करण्यासाठी अमेरिकेने 2क्क्9 पासून 11 अब्ज डॉलर्स खचरूनही हा प्रकल्प कुठेही मूळ धरताना दिसत नाही. त्यामुळे अमेरिका हायस्पीड रेल्वेत युरोप आणि चीनच्या खूप मागे पडला आहे.
बराक ओबामा प्रशासनाने चुकीची धोरणो राबविल्यामुळे हा प्रकल्प रखडला असल्याचा ठपका वाहतूक तज्ज्ञ आणि रिपब्लिकन व डेमोक्रॅट पक्षांच्या सदस्यांनी ठेवला असून या प्रकल्पासाठी आणखी 1क् अब्ज डॉलर्सची मागणी गेल्या जुलै महिन्यात केली आहे. 11 अब्ज डॉलर्स थेट या प्रकल्पात गुंतविण्याऐवजी प्रशासनाने सध्याची अॅमट्रॅक सव्र्हिस सुधारणा करण्यासाठी वापरले. त्यामुळे रेल्वे फार तर तासाला 11क् मैल एवढय़ाच वेगाने धावू शकतील, असे टीकाकारांचे म्हणणो आहे. हायस्पीड रेल्वेचा प्रकल्प बहुतांश नॉर्थ-ईस्ट कॉरिडॉरमध्ये होणार असला तरी प्रत्यक्षात पैसा तिकडे खर्च झालाच नाही.
वेस्टर्ली आणि क्रॅनस्टन आरआय हा 3क् मैलांचा प्रवास अॅमट्रॅक (जिची गती तासाला 15क् मैल आहे) रेल्वे 5 ते 1क् मिनिटांत करते. न्यूयॉर्क ते वॉशिंग्टन कॉरिडॉर या अत्यंत गर्दीच्या अॅसेला मार्गावर रेल्वे तासाला सरासरी 8क् मैल या वेगाने धावते. अॅसेला रेल्वे जपानच्या बुलेट ट्रेन्स (या बुलेट ट्रेनचा वेग तासाला 22क् मैल आहे) सारखी करण्याची योजना आहे. ही योजना चुकूनही प्रत्यक्षात आली तर त्यासाठी 15क् अब्ज डॉलर्स व 26 वर्षे लागतील.
रिपब्लिकन गव्हर्नर्स असलेल्या फ्लोरिडा, ओहिओ आणि विस्कोनसिन राज्यांनी हा हायस्पीड रेल्वे प्रकल्प रद्द केला आहे. (वृत्तसंस्था)