शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
3
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
4
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
5
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
6
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
7
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
8
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
9
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
10
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
11
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
12
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
13
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
14
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
15
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
16
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
17
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
18
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
19
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
20
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  

अमेरिकन एअरफोर्सच्या प्रमुखांनी अनुभवला 'Made-In-India' तेजसचा थरार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2018 7:24 PM

भारत दौ-यावर आलेले अमेरिकन हवाई दलाचे प्रमुख डेव्हीड एल गोल्डफीन यांनी शनिवारी स्वदेशी बनावटीच्या 'तेजस' या लढाऊ विमानातून उड्डाणाचा अनुभव घेतला.

ठळक मुद्देयापूर्वी सिंगापूरचे संरक्षण मंत्री इंग हेन यांनी सुद्धा तेजसमधून उड्डाणाचा अनुभव घेतला आहे. परदेशी पाहुणे तेजसचा हवेतील थरार अनुभवताना भरभरुन कौतुक करत आहेत पण भारतीय हवाई दल तेजसबद्दल फारसे उत्सुक्त नाहीय.

जोधपूर - भारत दौ-यावर आलेले अमेरिकन हवाई दलाचे प्रमुख डेव्हीड एल गोल्डफीन यांनी शनिवारी स्वदेशी बनावटीच्या 'तेजस' या लढाऊ विमानातून उड्डाणाचा अनुभव घेतला. एअर फोर्सच्या जोधपूर तळावरुन त्यांनी तेजसमधून उड्डाण केले. यावेळी एअर व्हाईस मार्शल एपी सिंह सहवैमानिक म्हणून त्यांच्यासोबत होते. अमेरिकन आणि भारतीय हवाई दलामधील दृढसंबंधांचे हे संकेत आहेत असे संरक्षण दलातील सूत्रांनी सांगितले. 

यापूर्वी सिंगापूरचे संरक्षण मंत्री इंग हेन यांनी सुद्धा तेजसमधून उड्डाणाचा अनुभव घेतला आहे. भारत-अमेरिकासंबंध अधिक दृढ व्हावेत या हेतुन डेव्हीड गोल्डफीन गुरुवारपासून भारत दौ-यावर आहेत. परदेशी पाहुणे तेजसचा हवेतील थरार अनुभवताना भरभरुन कौतुक करत आहेत पण भारतीय हवाई दल तेजसबद्दल फारसे उत्सुक्त नाहीय. भारतीय हवाई हद्दीच्या संरक्षणासाठी एकटया 'तेजस'वर अवलंबून चालणार नाही. 

स्वदेशी बनावटीचे हे लढाऊ विमान स्वसंरक्षणासाठी पुरेसे ठरणार नाही असे भारतीय हवाई दलाकडून केंद्र सरकारला सांगण्यात आले आहे. तेजस हे जेएएस 39 ग्रिपेन, एफ-16 या लढाऊ विमानांशी तेजस स्पर्धा करु शकत नाही. ग्रिपेन, एफ-16 च्या तुलनेत तेजसमध्ये अजून भरपूर सुधारणांची आवश्यकता आहे असे हवाई दलाने सांगितले.  

काय म्हणाले सिंगापूरचे संरक्षण मंत्री तेजसबद्दल सिंगापूरचे संरक्षण मंत्री इंग हेन नोव्हेंबरमध्ये भारत दौ-यावर आले होते. त्यावेळी त्यांनी कालायकुंदा विमानतळावरुन तेजसमधून उड्डाण केले. जवळपास अर्धा तास त्यांनी तेजसचे कौशल्य अनुभवले. तेजस एक उत्कृष्ट लढाऊ विमान असून मला या विमानाने आकर्षित केले आहे असे हेन पत्रकारांशी बोलताना म्हणाले. तेजस विमानाच्या खरेदीमध्ये सिंगापूरला स्वारस्य आहे का ? या प्रश्नावर हेन म्हणाले कि, मी वैमानिक नाहीय. तांत्रिक विषयाचे जाणकार यासंबंधी निर्णय घेतील. बहरीन एअर शोच्यावेळीही तेजसने आपले कौशल्य दाखवले होते त्यावेळी मध्य आशियातील काही देशांनी तेजसच्या खरेदीमध्ये रस दाखवला होता असे संरक्षण मंत्रालयाशी संबंधित सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दल