शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं"
3
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन करणार नाही - उद्धव ठाकरे
4
जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
5
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
6
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
7
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
8
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
9
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
10
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
11
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
12
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
13
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
14
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
15
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
16
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
17
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
18
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
19
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
20
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे

ेसुधारित बातमी- भारतावर जगाच्या आशा केंद्रित- मोदी कुशल शिक्षक घडविण्यावर भर : अस्सीघाटाला दिली भेट

By admin | Updated: December 25, 2014 22:41 IST

वाराणसी- मोठ्या प्रमाणात कुशल शिक्षक तयार करण्यावर भर देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, भारतावर जगाच्या आशा केंद्रित झाल्या असून देश मात्र त्यासाठी अद्याप तयार नाही असे प्रतिपादन येथे केले. त्यांनी यावेळी जगात सर्वोत्कृष्ट शिक्षक निर्यात करण्याचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवावे असे आवाहन केले व त्यासाठी शालेय अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर पाच वर्षांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाची शिफारस केली.

वाराणसी- मोठ्या प्रमाणात कुशल शिक्षक तयार करण्यावर भर देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, भारतावर जगाच्या आशा केंद्रित झाल्या असून देश मात्र त्यासाठी अद्याप तयार नाही असे प्रतिपादन येथे केले. त्यांनी यावेळी जगात सर्वोत्कृष्ट शिक्षक निर्यात करण्याचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवावे असे आवाहन केले व त्यासाठी शालेय अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर पाच वर्षांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाची शिफारस केली.
आपल्या वाराणसी दौऱ्यात त्यांनी, शिक्षकांना तयार करण्यासाठी वातावरण निर्माण करण्याची गरज मांडताना ते भारताच्या परंपरा व संस्कृतीत निहित असल्याचे म्हटले. जागतिक स्तरावर चांगल्या शिक्षकांची गरज असून, त्यांना लाखोंच्या संख्येने निर्यात केले जाऊ शकते असे ते पुढे म्हणाले.
बनारस हिंदू विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात पंतप्रधानांनी, २१ वे शतक हे ज्ञानाचे शतक आहे व त्या दिशेने पावले टाकण्याची जबाबदारी भ ारतावर आहे. हीच काळाचीही मागणी आहे असे म्हटले. त्यांनी यावेळी पं. मदन मोहन मालवीय राष्ट्रीय शिक्षक व शिक्षण मिशन या ९०० कोटींच्या योजनेचा प्रारंभ केला. मोदी सरकारने मालवीय यांना मरणोपरांत भारतरत्न देण्याचाही निर्णय अलीकडेच घेतला आहे.
यावेळी त्यांनी, जे विद्यार्थी १० वी वा १२ वीचे शिक्षण पूर्ण करून शिक्षक होऊ इच्छितात त्यांना त्या क्षेत्रात प्रशिक्षित केले जाण्याचे वातावरण तयार व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. चांगल्या शिक्षकांची बरीच वानवा आहे. ज्यांच्याजवळ कोट्यवधी रुपये आहेत अशांना जर विचारले की त्यांना काय हवे, तर तेही चांगल्या शिक्षकांची गरज असल्याचे म्हणतील. एखादा वाहनचालकही त्याला चांगल्या मागदर्शकाची असलेली गरज व्यक्त करू शकेल. हे सर्व पाहता, विद्यार्थ्यांनी १० वी किंवा १२ वीतच आपण शिक्षक व्हावे असे निश्चित केले पाहिजे या पद्धतीचे वातावरण तयार होण्याची गरज आहे. या विद्यार्थ्यांसाठी शिक्षक प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम असावा. ज्यात त्यांना बाल मानसशास्त्र, परंपरा, समुपदेशन आदी बाबींचे प्रशिक्षण दिले जाईल. जगात चांगल्या शिक्षकांची गरज आहे व भारत ती गरज पूर्ण करू शकतो असे मोदी पुढे म्हणाले. विज्ञान तंत्रज्ञान व संशोधनाची मोठी गरज आहे आणि त्यात भारताची भूमिका महत्त्वाची ठरू शकते.
ज्यांना इतरत्र काम मिळत नाही असे लोक शिक्षकी पेशात येतात जे समजले जाते. तो दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे असे मोदी यावेळी म्हणाले. आपल्या देशातील शिक्षण धोरण हे यंत्रमानव तयार करण्याचे नसून शिक्षण संस्कृती तयार करण्याचे आहे.
मोदींनी यावेळी वाराणसी महोत्सवाचेही उद्घाटन केले. यात त्यांनी हस्तकलेच्या समृद्ध परंपरेबाबत चर्चा केली. मात्र या क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर अधिक व्हावा असे त्यांनी सुचविले. पर्यटनाच्या क्षेत्रात वाराणसीच्या शक्यतांना अधोरेखित करताना मोदींनी, येथे शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जावे अशी सूचना केली. वाराणसीतील प्रत्येक शाळेने सांस्कृतिक विषयात प्राविण्य मिळवावे असे आवाहन त्यांनी केले.
त्यांनी यावेळी २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून संयुक्त राष्ट्र संघटनेने घोषित केल्याचे सांगून, १७७ देशांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिल्याचे म्हटले.
त्यांनी यावेळी स्वच्छता अभियानाचाही उल्लेख करून, अस्वच्छतेमुळे होणाऱ्या आजारांपायी एक गरीब व्यक्ती दरवर्षी ७००० रु. खर्च करते अशी माहिती दिली. स्वच्छतेचे अभियान राबविल्याने त्याचा लाभ गरिबांना आर्थिक रूपाने होईल असे ते म्हणाले.

अस्सीघाटाच्या स्वच्छतेकरिता नागरिकांचे आभार
वाराणसी-स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत येथील प्रसिद्ध अस्सीघाटावर असलेल्या मातीच्या व कचऱ्याच्या ढिगाऱ्याला हटवून या घाटाला त्याचे जुने वैभव प्राप्त करून दिल्याबद्दल मोदींनी नागरिकांचे आभार मानले. या अभियानात त्यांनीही सहभाग घेऊन या घाटाची स्वच्छता केली होती.
कोट्यवधी देशवासीयांच्या श्रद्धेचे स्थान बनलेल्या या घाटाला त्याचे मूळ स्वरूप प्राप्त झाल्याबद्दल त्यांनी आनंद व आभार व्यक्त केले. त्यांनी या अभियानाकरिता नागालँडचे राज्यपाल पद्मनाथ आचार्य, माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी, माजी क्रिकेट कप्तान सौरभ गांगुली, हास्यकलावंत कपिल शर्मा, नृत्यांगना सोनल मानसिंग, इनाडू समूहाचे के. रामोरीजाव, इंडिया टुडेचे अरुण पुरी यांना नियुक्त केले होते.
त्यांनी यावेळी देशाला व जगाला नाताळच्या शुभेच्छाही दिल्या. तसेच काशी नरेश विभूती नारायण सिंग यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली.

पंतप्रधानांच्या दौऱ्याआधी २५ जणांना अटक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी दौऱ्याआधी निदर्शने करण्याची योजना आखत असलेल्या २५ हून अधिक नागरिकांना पोलिसांनी विविध भागातून अटक केली. ते सरकारच्या विरोधात अनेक मुद्यांवर निदर्शने करणार असल्याचा संशय पोलिसांना होता. यात रेल्वे कर्मचारी संघटनेचे कार्यकर्ते, शहीद भगतसिंग युवा मोर्चाचे कार्यकर्ते व विद्यार्थ्यांच्या संघटनेचे काही विद्यार्थी आहेा.
पंतप्रधानांच्या भेटीचा वाराणसीला काहीच फायदा नाही. भेटी व आश्वासने देण्याऐवजी काम करण्यावर सपाचा विश्वास आहे. पक्षाचे सुप्रीमो मुलायमसिंग यादव यांनी आजमगडच्या विकासासाठी कठोर परिश्रम घेतले. केंद्र सरकार हे संघाचा अजेंडा राबवीत असून, मोदी आणि संघात काही फरक नाही.
उत्तर प्रदेशचे मंत्री नारद राय