शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅम्बी व्हॅली बे‘सहारा’

By admin | Updated: February 7, 2017 05:56 IST

सहारा ग्रुपचा पुण्यातील अत्यंत महत्त्वाचा ‘अ‍ॅम्बी व्हॅली’ हा प्रकल्प जप्त करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला

नवी दिल्ली : सहारा ग्रुपचा पुण्यातील अत्यंत महत्त्वाचा ‘अ‍ॅम्बी व्हॅली’ हा प्रकल्प जप्त करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांचे १४ हजार ७७९ कोटी रुपये उभे करणे सहारा ग्रुप आणि सुब्रतो रॉय यांना भाग पडावे, यासाठी हा आदेश आवश्यक असल्याचे न्यायालयाने म्हटले. न्या. दीपक मिश्र यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा आदेश दिला. ‘अ‍ॅम्बी व्हॅली’ हा प्रकल्प सहारा ग्रुपने विकसित केलेला आहे. कोणतेही कर्ज नसलेल्या मालमत्तांची यादी २० फेब्रुवारीपर्यंत देण्यासही न्यायालयाने सहारा ग्रुपला सांगितले आहे. त्यामुळे या मालमत्तेचा सार्वजनिक लिलाव करण्याचा निर्णय त्याला घेता येईल. जे पैसे देणे आहेत, ते या लिलावातून उभे केले जातील. सध्याची टप्प्याटप्प्याने पैसे देण्याची पद्धत खंडपीठाला मान्य नाही. सहाराने आतापर्यंत केवळ ११ हजार कोटी रुपयेच दिले असून, उरलेले १४ हजार ७७९ कोटी रुपये सेबीकडे भरण्यासाठी जुलै २०१९ पर्यंतचा वेळ मागून घेतला आहे. सहाराने सेबीकडे सोमवारी फक्त ६०० कोटी रुपये जमा केले. पैसे भरण्याची मुदत जुलै २०१९ पर्यंत लांबवणे खूपच लांबत जात असून, थकलेले पैसे उभे करण्यासाठी मालमत्तांचा लिलाव व्हावा, असे न्यायालयाला वाटते. यापुढील सुनावणी २० फेब्रुवारी रोजी होणार आहे. ‘अ‍ॅम्बी व्हॅली’ची जाहीर झालेली किंमत ३९ हजार कोटी रुपये आहे. सिब्बल म्हणाले, ‘जप्तीची घाई कशासाठी?’सहारा ग्रुपचे वकील कपिल सिब्बल यांनी खंडपीठाला मालमत्ता जप्तीचा आदेश देऊ नका, अशी विनंती केली होती. जप्तीची घाई कशासाठी? बँक पैशाची मागणी करीत नाही. कोणत्याही गुंतवणूकदाराने पैसे मागितलेले नाहीत, असे सिब्बल म्हणाले. कंपनीने आधीच ८५ टक्के गुंतवणूकदारांचे देणे अदा केले असल्याचा दावा करणारा, प्राप्तिकर अपिलेट लवादाचा आदेशही या वेळी अ‍ॅड. सिब्बल यांनी दाखवला. सहाराने काही दप्तर (रेकॉर्ड) सादर करण्याची ही पहिलीच वेळ होती. सिब्बल यांनी लवादाने आवश्यक ती खातरजमा केल्यानंतरच निवाडा दिला आहे, असे म्हटले. गुंतवणूकदारांकडून दोन आर्थिक योजनांद्वारे (सेबीने या दोन्ही आर्थिक योजना बेकायदा असल्याचे जाहीर केले होते) जमवलेले पैसे परत करण्यास, सहाराला ३१ आॅगस्ट २०१२ रोजी दिल्या गेलेल्या आदेशाबाबत अ‍ॅड. सिब्बल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले, परंतु खंडपीठाचे यामुळे समाधान झाले नाही. खंडपीठ म्हणाले की, ‘आम्ही त्या आदेशावर फेरविचार करणार नाही. तुमच्याविरोधात न्यायालयीन निष्कर्ष आहेत आणि आम्ही येथे आदेशाचा फेरविचार करण्यासाठी नाही आहोत.’ सहाराचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना मिळालेला पॅरोल सध्या कायम राहील. न्यायालयाने आदेश देऊनही सुब्रतो रॉय न्यायालयात हजर न राहिल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने मार्च २०१४ मध्ये त्यांना तुरुंगात पाठवले होते. गेल्या वर्षी मे महिन्यात रॉय यांच्या आईचे निधन झाल्यावर रॉय यांना पॅरोल मंजूर झाला होता. रॉय यांना तुरुंगात पुन्हा जायची वेळ येऊ नये, म्हणून कंपनी सेबीकडे पैसे भरत आहे.