शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

हृदयद्रावक! रुग्णवाहिका न मिळाल्यानं आईनेच हातगाडीला धक्के मारत मुलाला रुग्णालयात पोहोचवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2020 4:42 PM

छत्तीसगडमधील वाड्रफनगर सरगुजा परिसरात अशीच एक दयनीय घटना घडली आहे.

कोरोनाकाळात लॉकडाऊनमुळे कधीही उद्भवलेल्या गंभीर स्थितीचा सामना अनेकांना करावा लागला आहे. कोरोना संक्रमणाचा वेग झपाट्यानं वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणाही अनेक ठिकाणी सेवा पुरवू शकत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. छत्तीसगडमधील वाड्रफनगर सरगुजा परिसरात अशीच एक दयनीय घटना घडली आहे.

बलरामपूर जिल्ह्यातील वाड्रफनगर येथे एक कामगार रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत दिसून आला.  उपस्थित लोकांनी रुग्णवाहिकेस फोन केल्यास रुग्णवाहिका उपलब्ध नसून इतर ठिकाणी पाठवल्याचे कळाले. त्यानंतर नाईलाजाने या कामगाराच्या आई वडिलांनी एका हातगाडीवर ठेवून आपल्या मुलाला रुग्णालयापर्यंत पोहोचवले. यावेळी पिडीत व्यक्तीच्या वृद्ध आईने या हातगाडीला धक्का मारत रुग्णालयापर्यंत पोहोचवले.

वाड्रफनगर येथिल रहिवासी असलेले अशोक पासवान हातगाडी चालवून आपला उदरनिर्वाह करतात. बुधवारी राजीव गांधी चौकात अचानक चक्कर येऊन पडल्यानं त्यांना गंभीर जखम झाली हे पाहून आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी रुग्णवाहिकेला १०८ या क्रमांकावर फोन केल्यास कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. बराचवेळ रस्त्याच्याकडेला पडलेल्या व्यक्तीला पाहून  कोणत्याही खासगी वाहनानं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याची हिंमत केली नाही. 

जेव्हा या व्यक्तीच्या आई वडिलांपर्यंत ही बाब पोहोचली. त्यानंतर त्यांनी आपल्या शेजारच्यांकडून हातगाडी मागत  त्या हातगाडीवर मुलाला ठेवून रुग्णालयात घेऊन गेले.  आईने संपूर्ण रस्ता हातगाडीला धक्का मारत कसंबसं रुग्णालयापर्यंतचे अंतर पार केले. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार डोक्याला गंभीर जखमी झाल्यामुळे अंबिकापूर मेडिकल कॉलेजमध्ये भरती करण्याचे सांगितले आहे. या घटनेनं आसपासच्या परिसरात  खळबळ पसरली आहे. आरोग्यव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

बाबो! ऑफिस मीटिंगमध्ये व्यक्तीच्या फोनवर आला मेसेज, उघडताच ३० सेकंदात संपलं पूर्ण करिअर

बोंबला! मजेसाठी 'त्याने' प्रायव्हेट पार्टमध्ये टाकले असे काही, सीटी स्कॅन पाहून डॉक्टरही झाले हैराण....

टॅग्स :hospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या