काँग्रेस यंदा साजरी करणार वर्षभर आंबेडकर जयंती

By Admin | Updated: April 3, 2015 23:45 IST2015-04-03T23:30:49+5:302015-04-03T23:45:00+5:30

: काँग्रेसने संपूर्ण देशभरात वर्षभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १४ एप्रिल २०१५ पासून १४ एप्रिल २०१६ प

Ambedkar Jayanti during the year to celebrate Congress this year | काँग्रेस यंदा साजरी करणार वर्षभर आंबेडकर जयंती

काँग्रेस यंदा साजरी करणार वर्षभर आंबेडकर जयंती

नवी दिल्ली : काँग्रेसने संपूर्ण देशभरात वर्षभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १४ एप्रिल २०१५ पासून १४ एप्रिल २०१६ पर्यंत आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाईल.
जयंती कार्यक्रमाअंतर्गत काँग्रेसच्या नेत्यांची मुंबईत राष्ट्रीय बैठकही आयोजित केली जाईल. जयंती समारंभाच्या संचालनासाठी सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली २१ सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. या समितीत राहुल गांधी, सुशीलकुमार शिंदे, मल्लिकार्जुन खरगे, अहमद पटेल, ए.के. अंथोनी, गुलाम नबी आझाद, मीरा कुमार, पी. चिदंबरम. के. सी. देव, आनंद शर्मा, वीरप्पा मोईली आदी नेत्यांचा सहभाग असणार आहे. (प्रतिनिधी)


 

Web Title: Ambedkar Jayanti during the year to celebrate Congress this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.