विद्यार्थ्यांना शालेयोपयोगी साहित्यवाटप करून आंबेडकर जयंती साजरी
By Admin | Updated: April 15, 2016 23:39 IST2016-04-15T01:55:09+5:302016-04-15T23:39:54+5:30
पाटोदा : विखरणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त १२५ गरीब विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, वा व पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

विद्यार्थ्यांना शालेयोपयोगी साहित्यवाटप करून आंबेडकर जयंती साजरी
पाटोदा : विखरणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त १२५ गरीब विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, वा व पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे रा.यु.कॉँ.चे तालुकाध्यक्ष मोहन शेलार यांनी पूजन केले तर तथागत गौतम बुद्धांच्या प्रतिमेचे बापू शेलार यांनी पूजन केले तर शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे सरपंच रामदास खुरसणे यांनी प्रतिमा पुजन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल खरे यांच्या हस्ते बिजलाईनगरच्या शाळेत स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले व विद्यार्थ्यांची भाषणे झाली.
यानंतर विखरणी गावातील चौफुलीवर प्रबुद्ध मित्रमंडळाच्या वतीने कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी गावातील जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांची भाषणे झाली. डॉ. बाबासाहेब यांच्या विषयावर दहा दिवस जरी व्याख्यान आयोजित केले तरीही विषय संपणार नाही, त्यांनी जो त्याग केला आहे तो कुणीही करू शकत नाही, असे बाळासाहेब उशीर यांनी आपल्या भाषणात सांगितले,तर आज गावात अनुसूचित जमातीच्या व्यक्तीला सरपंच पद आरक्षणातून मिळाले व अनुसुचीत जातीच्या व्यक्तीला तंटामुक्तीचे अध्यक्ष करण्यात आले हे कोणामुळे तर बाबासाहेबांच्या संविधाना मुळे आहे, २१ एप्रिल रोजी रौप्य महोत्सवी जयंती निमित्ताने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्याचे नियोजन असल्याचे शेलार यांनी सांगितले. यानंतर गोरख आहिरे,नामदेव पगार,यमाजी शेलार,अशोक बंदरे,अनील खरे,सुनील हिंगे यांनी मनोगत व्यक्त केले.
यानंतर विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्कूल बॅग,वह्या, पुस्तके वाटप करण्यात आले. यावेळी आंबेडकर प्रतिष्ठानचे सुनील खरे,सोमनाथ खरे,रमेश आहिरे,खरे,अशोक खरे, राहूल खरे,जीवन डावरे,दिनेश आहिरे,राजू खरे,कृष्णा खरे,शुभम मोकळ यांचे े सहकार्य लाभले,यावेळी अक्षय रोठे,संदिप झांबरे, ग्रामसेवक खैरे ,बाळू खरे व ग्रामस्थ उपस्थित होते.( वार्ताहर)
फोटो - डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप करतांना अध्यक्ष अनील खरे,मोहन शेलार,बापू शेलार व इतर मान्यवर (१४पाटोदा)