पाटोदा येथे आंबेडकर जयंती साजरी
By Admin | Updated: April 15, 2016 22:48 IST2016-04-15T01:55:24+5:302016-04-15T22:48:26+5:30
पाटोदा - येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.

पाटोदा येथे आंबेडकर जयंती साजरी
पाटोदा - येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.
ााटोदा येथील भिमतेज मित्रमंडळ व जि.प.प्राथमिक शाळा पाटोदाच्या वतीने भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . त्यावेळी येवल्याचे गटविकास अधिकारी म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकरकरांनी नेहमीच देशाला अधिक महत्व दिले.त्यांनी देशाच्या प्रगतीसाठी सर्व समाजाला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी सरपंच अनिता धनवटे या होत्या.
या प्रसंगी पंचायत समतिी सदस्य रतन बोरनारे,साहेबराव आहेर.उस्मानभाई शेख इतर मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर उपस्थिताना मार्गदर्शन केले.स्नेहा शिंदे आरती पगारे,काजल जाधव,इंद्रायणी बोराडे,वर्षा राजगुरू,सार्थक कुंभकर्ण या चौथीच्या विधार्थ्यानी डॉ.आंबेडकरांच्या जीवनावर समयोचित भाषणे केली.या विध्यार्थ्यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.या प्रसंगी माजी जि.प सदस्य बाळासाहेब पिंपरकर,अशोक मेंगाणे.मारु ती जानकीदास पगारे,घोरपडे ,पोपट धनवटे,ग्रामसेवक बी.एल मोहिते,रमेश बोरनारे,विलास पगारे, अहमद शेख बाबासाहेब भुसारे,आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्र माचे सूत्रसंचालन श्रीमती पगारे यांनी केले. (वार्ताहर) (फोटो -१४ पाटोदा१)