‘ऑपरेशन पंजाब’मध्ये पक्ष श्रेष्ठींसमोर ३ पर्याय; अमरिंदर सिंग यांची समितीशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 06:45 AM2021-06-05T06:45:04+5:302021-06-05T06:45:24+5:30

सोनिया गांधी यांच्यासमोर तीन पर्याय आहेत. मंत्रिमंडळ पुनर्रचना करण्यास सांगणे आणि नवज्योत सिंग सिद्ध आणि इतर बंडखोरांना त्यात सामावून घेणे. तसे झाल्यास तो बंडखोरांचा विजय समजला जाईल.

In Amarinder Singh vs Navjot Sidhu Punjab Congress loses out central team scrambles to iron out differences | ‘ऑपरेशन पंजाब’मध्ये पक्ष श्रेष्ठींसमोर ३ पर्याय; अमरिंदर सिंग यांची समितीशी चर्चा

‘ऑपरेशन पंजाब’मध्ये पक्ष श्रेष्ठींसमोर ३ पर्याय; अमरिंदर सिंग यांची समितीशी चर्चा

Next

- व्यंकटेश केसरी

नवी दिल्ली : मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शुक्रवारी येथे तीन सदस्यांच्या समितीची भेट घेतल्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस समितीचे ‘ऑपरेशन पंजाब’ सुरू झाले. आता पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना राज्यात विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी राज्य शाखेत समतोल राखण्याचे नाजूक काम करायचे आहे. 

सोनिया गांधी यांच्यासमोर तीन पर्याय आहेत. मंत्रिमंडळ पुनर्रचना करण्यास सांगणे आणि नवज्योत सिंग सिद्ध आणि इतर बंडखोरांना त्यात सामावून घेणे. तसे झाल्यास तो बंडखोरांचा विजय समजला जाईल. पंजाब प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षांसह संघटनेत बदल घडवणे आणि सरकार आणि पक्ष यांच्यात उत्तम समन्वयासाठी समन्वय समिती स्थापन करणे. पंजाब प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सुनील जाखर यांना बदलले जाऊ शकते. मात्र यासाठी अमरिंदर सिंग तयार नाहीत. ऑपरेशन पंजाबचा हेतू हा अमरिंदरसिंग यांचे अधिकार कापण्याचा असला तरी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांशी शत्रूत्व घेणे परवडणारे नाही. त्याचे उलट परिणाम होऊ शकतील. याचे कारण असे की, सिंग यांच्या राजकीय शत्रूंपैकी कोणीही कॅप्टन सिंग यांना वगळून निवडणूक जिंकून देऊ शकत नाही. पंजाबमध्ये हे विरोधक किंवा केंद्रीय नेतृत्व मते खेचू शकत नाहीत. मल्लिकार्जुन खरगे अध्यक्ष असलेल्या या तीन सदस्यांच्या समितीत जे. पी. अग्रवाल आणि हरीश रावत यांचा समावेश आहे. पक्षाच्या नेत्यांशी झालेली चर्चा आणि घडामोडींची माहिती समितीने राहुल गांधी यांना दिल्याचे बोलले जाते. समिती अहवाल दोन दिवसांत सोनिया गांधी यांना सादर करण्याची अपेक्षा आहे.

महत्त्वाची पदे हवीत
अमरिंदर सिंग हे शिराेमणी अकाली दल,  भाजप आणि आम आदमी पक्षाशी तसेच पक्षातील नाराजांशी लढत आहेत. या नाराजांना पक्ष श्रेष्ठींच्या पाठिंब्यामुळे महत्त्वाची पदे हवी आहेत. २०१९ पासून काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणूक हरतो आहे. तरी महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये तो कनिष्ठ भागीदार म्हणून सत्तेत सहभागी आहे.

Web Title: In Amarinder Singh vs Navjot Sidhu Punjab Congress loses out central team scrambles to iron out differences

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.