शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आमच्या मातृभाषेविषयी तुम्ही उपदेश करू नका; राज्यपालांच्या वक्तव्यावर  तामिळनाडू सरकार भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 07:43 IST

राज्यपाल आर. एन. रवी यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, अनेक अडचणी असूनही या जिल्ह्यांतील मंडळींनी आपली सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवली आहे. मात्र या लोकांना योग्य संधी उपलब्ध होताना दिसत नाही.

चेन्नई : तामिळनाडूतील हिंदी भाषेविरुद्ध सुरू असलेल्या वादात आता त्या राज्याचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी उडी घेतली. ते म्हणाले की, तामिळनाडू सरकार द्विभाषा सूत्राचा आग्रह धरत असून त्यामुळे त्या राज्यातील दक्षिण भागातल्या युवकांना उत्तम संधींपासून वंचित राहावे लागत आहे. तो एक प्रकारे उपेक्षित प्रदेश बनला आहे. या टीकेला प्रत्युत्तर देताना सत्ताधारी द्रमुक पक्षाने म्हटले आहे की, राज्यपाल हे तामिळनाडूविरोधात द्वेष पसरविण्याचा प्रयत्न करत आहेत.

राज्यपाल आर. एन. रवी यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, अनेक अडचणी असूनही या जिल्ह्यांतील मंडळींनी आपली सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवली आहे. मात्र या लोकांना योग्य संधी उपलब्ध होताना दिसत नाही. (वृत्तसंस्था)

राज्यपाल वारंवार द्वेष पसरवत आहेततामिळनाडूचे कायदामंत्री एस. रघुपती यांनी सांगितले की, तामिळी लोकांना त्यांच्या मातृभाषेविषयी कोणीही उपदेश करू नये. राज्यपाल आर. एन. रवी वारंवार तामिळ भाषा, तामिळनाडू, राज्यगीत याविरोधात द्वेष पसरवत आहेत. या राज्याची अर्थव्यवस्था उत्तम असून शैक्षणिक क्षेत्रातही उत्तम प्रगती केली आहे. ते राज्यपालांना सहन होत नाही, असा आरोप त्यांनी केला. 

लोकसंख्येवर खासदार संख्या ठरवू नका : स्टॅलिनकेवळ लोकसंख्येच्या आधारावर संसदीय मतदारसंघांचे निर्धारण करून दक्षिणेकडील राज्यांना दंडित करू नये, असे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर असा प्रयत्न झाला तर त्याला विरोध केला जाईल, असेही त्यांनी म्हटले. लोकसंख्या वाढीवर नियंत्रणासाठी जबाबदारपणे उपाय करणाऱ्या दक्षिणेकडील राज्यांना शिक्षा देऊ नका, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Tamilnaduतामिळनाडू