आमच्या मातृभाषेविषयी तुम्ही उपदेश करू नका; राज्यपालांच्या वक्तव्यावर तामिळनाडू सरकार भडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 07:43 IST2025-03-01T07:43:33+5:302025-03-01T07:43:44+5:30
राज्यपाल आर. एन. रवी यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, अनेक अडचणी असूनही या जिल्ह्यांतील मंडळींनी आपली सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवली आहे. मात्र या लोकांना योग्य संधी उपलब्ध होताना दिसत नाही.

आमच्या मातृभाषेविषयी तुम्ही उपदेश करू नका; राज्यपालांच्या वक्तव्यावर तामिळनाडू सरकार भडकले
चेन्नई : तामिळनाडूतील हिंदी भाषेविरुद्ध सुरू असलेल्या वादात आता त्या राज्याचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी उडी घेतली. ते म्हणाले की, तामिळनाडू सरकार द्विभाषा सूत्राचा आग्रह धरत असून त्यामुळे त्या राज्यातील दक्षिण भागातल्या युवकांना उत्तम संधींपासून वंचित राहावे लागत आहे. तो एक प्रकारे उपेक्षित प्रदेश बनला आहे. या टीकेला प्रत्युत्तर देताना सत्ताधारी द्रमुक पक्षाने म्हटले आहे की, राज्यपाल हे तामिळनाडूविरोधात द्वेष पसरविण्याचा प्रयत्न करत आहेत.
राज्यपाल आर. एन. रवी यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, अनेक अडचणी असूनही या जिल्ह्यांतील मंडळींनी आपली सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवली आहे. मात्र या लोकांना योग्य संधी उपलब्ध होताना दिसत नाही. (वृत्तसंस्था)
राज्यपाल वारंवार द्वेष पसरवत आहेत
तामिळनाडूचे कायदामंत्री एस. रघुपती यांनी सांगितले की, तामिळी लोकांना त्यांच्या मातृभाषेविषयी कोणीही उपदेश करू नये. राज्यपाल आर. एन. रवी वारंवार तामिळ भाषा, तामिळनाडू, राज्यगीत याविरोधात द्वेष पसरवत आहेत.
या राज्याची अर्थव्यवस्था उत्तम असून शैक्षणिक क्षेत्रातही उत्तम प्रगती केली आहे. ते राज्यपालांना सहन होत नाही, असा आरोप त्यांनी केला.
लोकसंख्येवर खासदार संख्या ठरवू नका : स्टॅलिन
केवळ लोकसंख्येच्या आधारावर संसदीय मतदारसंघांचे निर्धारण करून दक्षिणेकडील राज्यांना दंडित करू नये, असे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर असा प्रयत्न झाला तर त्याला विरोध केला जाईल, असेही त्यांनी म्हटले. लोकसंख्या वाढीवर नियंत्रणासाठी जबाबदारपणे उपाय करणाऱ्या दक्षिणेकडील राज्यांना शिक्षा देऊ नका, असेही ते म्हणाले.