शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

अस्थाना यांच्या चौकशीमध्ये अजित डोवाल यांनी केला हस्तक्षेप, सीबीआय अधिकाऱ्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 21:15 IST

सुट्टीवर पाठवण्यात आलेले सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांनी सीव्हीसीच्या अहवालाबाबत सोमवारी सर्वोच्च न्यायालयात आपले उत्तर सादर केले.

ठळक मुद्देसुट्टीवर पाठवण्यात आलेले सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांनी सीव्हीसीच्या अहवालाबाबत सोमवारी सर्वोच्च न्यायालयात आपले उत्तर सादर केले. वर्मा यांनी सोमवारी सिलबंद लिफाफ्यामधून आपले उत्तर सर्वोच्च न्यायालत सादर केलेया प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी होणार

नवी दिल्ली - सुट्टीवर पाठवण्यात आलेले सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांनी सीव्हीसीच्या अहवालाबाबत सोमवारी सर्वोच्च न्यायालयात आपले उत्तर सादर केले. वर्मा यांनी सोमवारी सिलबंद लिफाफ्यामधून आपले उत्तर सर्वोच्च न्यायालत सादर केले. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी होणार आहे.  दरम्यान, राकेश अस्थाना यांच्या चौकशीमध्ये अजित डोवाल यांनी हस्तक्षेप केल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट एका अधिकाऱ्याने केला आहे. त्याआधीच्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने आलोक वर्मा यांना सीव्हीसीच्या अहवालाची प्रत देण्याची सूचना करून त्यावर वर्मा यांनी आपले म्हणणे न्यायालयात मांडावे, असे आदेश न्यायालयाने दिले होते. तसेच या प्रकरणाची सुनावणी मंगळवारीच होईल, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. सोमवारी सुनावणीस सुरुवात झाल्यावर वर्मा यांचे वकील गोपाल शंकरनारायणन यांनी या प्रकरणी उत्तर देण्यासाठी अजून काही अवधी देण्याची विनंती केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारची सुनावणी पुढे ढकलण्यास नकार दिला.दरम्यान, सीबीआयमधील दुसऱ्या क्रमांकाचे अधिकारी असलेल्या राकेश अस्थाना यांच्या विरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करत असलेल्या डीआयजी मनीष कुमार सिन्हा यांनी आपली बदली नागपूर येथे करण्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.  सिन्हा यांनी आपल्या याचिकेमधून सरकारकडून सीबीआयमध्ये हस्तक्षेप होत असल्याचा आरोप केला आहे. तसेच अजित डोवाल यांनी अस्थाना यांची चौकशी सुरू असताना दोन वेळा तपास कार्य रोखण्यास सांगितल्याचा आरोपही सिन्हा यांनी केला आहे.  दरम्यान, एका दलालाने चौकशीमध्ये गुजरातमधील खासदार आणि केंद्रीय कोळसा आणि खाण राज्यमंत्री हरिभाई पार्थिभाई चौधरी यांना काही कोटी रुपयांची लाच देण्यात आल्याचा गौप्यस्फोटही झाला आहे.  

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागSupreme Courtसर्वोच्च न्यायालय