शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात युती झाल्यास भाजपाला फायदा, पण सेनेला नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2018 18:37 IST

लोकसभेच्या आगामी निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना यांनी युती करून निवडणूक लढवल्यास काँग्रेस आणि भाजपाच्या आघाडीपेक्षा युती पुढे राहील, अशी शक्यता सर्व्हेमधून वर्तवण्यात आली आहे. मात्र युती झाल्यास त्याचा फायदा

नवी दिल्ली - सरकारमध्ये एकत्र  असूनही भाजपा आणि शिवसेनेमधील दुरावा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांमध्ये युती होण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना यांनी युती करून निवडणूक लढवल्यास काँग्रेस आणि भाजपाच्या आघाडीपेक्षा युती पुढे राहील, अशी शक्यता सर्व्हेमधून वर्तवण्यात आली आहे. मात्र युती झाल्यास त्याचा फायदा भाजपालाच  अधिक होईल, तर सेनेचे मात्र नुकसान होईल, असेही या सर्व्हेमध्ये नमूद करण्यात आले आहे. केंद्रातील मोदी सरकारला 26 मे रोजी चार वर्षे पूर्ण होत आहेत. त्याबरोबरच आता पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, विविध संस्थांमार्फत जनमताच्या कलाचे सर्व्हेही प्रसिद्ध होऊ लागले आहे. एबीपी न्यूज-सीएसडीएस आणि लोकनीतीने संयुक्तरीत्या केलेल्या सर्वेतील आकडेवारीनुसार महाराष्ट्रात भाजपा आणि शिवसेनेची युती झाल्यास या युतीला 48 टक्के मते मिळतील. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीला 40 टक्के मते मिळतील. 2014 च्या तुलनेत युतीच्या मतांच्या टक्केवारीत घट होण्याची शक्यता आहे. मात्र आघाडीच्या मतांमध्ये 5 टक्क्यांनी घसघशीत वाढ होऊ शकते. मात्र या सर्व्हेमधील आकडेवारीनुसार महाराष्ट्रात युती झाल्यास त्याचा फायदा शिवसेनेपेक्षा भाजपालाच अधिक होताना दिसत आहे. युती झाल्यास भाजपाच्या मतांच्या टक्केवारीत दोन टक्क्यांनी वाढ होऊन भाजपाला 29 टक्के मिळतील, दुसरीकडे युती झाल्यानंतरही शिवसेनेच्या मतांमध्ये तब्बल टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे गतवेळच्या 24 टक्क्यांवरून शिवसेनेची मतांची टक्केवारी 19 टक्क्यांवर घसरण्याचा अंदाज आहे.   

टॅग्स :ElectionनिवडणूकMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपाShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण