अमरनाथ यात्रेवर हल्ला करणारे तिघेही ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 03:37 IST2017-12-06T03:37:51+5:302017-12-06T03:37:55+5:30

जुलैमध्ये अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्यात सहभागी असलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या तीन अतिरेक्यांचा सुरक्षा दलाने मंगळवारी दक्षिण काश्मिरात चकमकीत खात्मा केला.

All three who attacked Amarnath Yatra killed | अमरनाथ यात्रेवर हल्ला करणारे तिघेही ठार

अमरनाथ यात्रेवर हल्ला करणारे तिघेही ठार

श्रीनगर : जुलैमध्ये अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्यात सहभागी असलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या तीन अतिरेक्यांचा सुरक्षा दलाने मंगळवारी दक्षिण काश्मिरात चकमकीत खात्मा केला. यातील दोन अतिरेकी पाकिस्तानी नागरिक होते. मारल्या गेलेल्या स्थानिक अतिरेक्याचे नाव यवर बशीर असून, विदेशी अतिरेक्यांची नावे अबू फुकरान व अबू माविया आहेत. बशीर या वर्षी लष्कर-ए-तोयबात सहभागी झाला होता.
अबू इस्माइल मारला गेल्यानंतर फुकरानकडे लष्कर-ए-तोयबाची सूत्रे होती. इस्माइलने जुलैमध्ये अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्याचा मास्टर माइंड होता. चकमकीत मारले गेलेले अतिरेकीही त्या हल्ल्यात सहभागी होते. या हल्ल्यात ८ यात्रेकरू मारले गेले होते आणि १९ जण जखमी झाले होते. या आधी चकमकीच्या वेळी फरार झालेल्या एका अतिरेक्याला पोलिसांनी अटक केली. त्याने श्रीनगरला जाणाºया सैन्याच्या वाहन ताफ्यावर काजीगुंडमध्ये साथीदारांसह हल्ला केला होता.

Web Title: All three who attacked Amarnath Yatra killed