शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

"अपघाताने आलेल्या सरकारचं सगळं कामकाजच अपघाती’’, विजय वडेट्टीवार यांची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 16:25 IST

Vijay Wadettiwar Criticize Mahayuti Government: महाराष्ट्राच्या नशिबात हे महाविनाशी सरकार आले हाच महाराष्ट्रातील जनतेसाठी मोठा अपघात आहे. ज्यातून या राज्याला सावरायला खूप वेळ जाईल, असा टोलाही विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे. 

मालवणजवळ राजकोट येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे महाराष्ट्रभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या दुर्घटनेवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अपघाताने आलेल्या सरकारचं सगळं कामकाजच अपघाती आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. तसेच महाराष्ट्राच्या नशिबात हे महाविनाशी सरकार आले हाच महाराष्ट्रातील जनतेसाठी मोठा अपघात आहे. ज्यातून या राज्याला सावरायला खूप वेळ जाईल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. 

या संदर्भात एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये विजय वडेट्टीवार म्हणाले की, अपघाताने आलेल्या सरकारचं सगळं कामकाजच अपघाती आहे. बदलापूर प्रकरण अपघात होता. समृध्दी महामार्गावर लोकांचे जीव गेले अपघात होता. नांदेड मधील शासकीय रुग्णालयात लोकं मेली अपघात होता. ठाणे शासकीय रुग्णालयात लहान बालके मेली तो अपघात होता. महाराष्ट्रभर ड्रग्स चा सुळसुळाट सुरू आहे तो एक अपघात आहे. ललित पाटील पळाला तो अपघात होता.रोज महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार होत आहे ते सुद्धा अपघाताने सुरू आहे. असे एक ना अनेक अपघात महाराष्ट्रात सुरू आहेत, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, तीन ड्रायव्हर आणि एक स्टिअरिंग असल्यावर स्टिअरिंग हातात घेण्यासाठी,  मीच किती मोठा जनतेचा रखवाला हे दाखवण्यासाठी या तिघांची जी धडपड सुरू आहे त्यामुळेच हे सगळे अपघात घडताहेत, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारMahayutiमहायुतीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार