शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
2
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
3
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
5
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
6
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
7
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
9
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
10
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
11
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
12
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
13
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
14
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
15
आता पहिलीपासूनच शिका शेती; शालेय अभ्यासक्रमात टप्प्याटप्प्याने कृषी विषयाचा समावेश
16
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
17
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
18
चिंताजनक ‘लडाख फाइल्स’! सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात सडविणे दिसते तितके सोपे नाही
19
ट्रम्प, जिमी किमेल आणि गुदगुल्यांचा ‘खंजीर’! ही एकी जगभरातील माध्यमांसाठी एक संदेशच...

ईशान्य भारतामधील सर्व राज्ये रेल्वेने जोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 01:18 IST

ईशान्य भारतातील सर्व राज्यांमध्ये येत्या दोन वर्षांत रेल्वेसेवा सुरू करण्याचे रेल्वे प्रशासनाने ठरविले असून, त्यासाठी सुमारे ९0 हजार कोटी रुपये खर्च येणार आहेत.

नवी दिल्ली : ईशान्य भारतातील सर्व राज्यांमध्ये येत्या दोन वर्षांत रेल्वेसेवा सुरू करण्याचे रेल्वे प्रशासनाने ठरविले असून, त्यासाठी सुमारे ९0 हजार कोटी रुपये खर्च येणार आहेत. त्यात अरुणाचल प्रदेशात ७९५ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाचाही समावेश आहे.अरुणाचल प्रदेशातील रेल्वेसेवेमुळे सीमेपाशी राहणाऱ्या भारतीयांचा प्रवास सोपा होईल, लष्कराला साधनसामग्रीची वाहतूक करणेही शक्य होईल. अरुणाचल प्रदेश व आसाम यांना जोडणारा ब्रह्मपुत्रेवरील बोगीबील पूल लवकरच खुला होणार असून, त्यामुळे या दोन राज्यांतील रेल्वेसेवाही शक्य होईल. सध्या आसाम, त्रिपुरा व अरुणाच प्रदेशचा अगदी लहान भाग रेल्वेने जोडला गेला आहे. मात्र अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगरसह मिझोरम, मेघालय, मणिपूर, सिक्किम व नागालँड या राज्यांच्या राजधान्या रेल्वेने जोडल्या गेलेल्या नाहीत. भैराबी व सायरंग या ५१ किमी लांबीच्या मार्गाने मिझोरमची राजधानी ऐझवालला जोडली जाईल. सायरंग हे ऐझवालपासून १८ किमीवर आहे. सिक्किमची राजधानी गंगटोकला जाण्यासाठी रांगपो या गावापर्यंत रेल्वे नेण्यात येणार आहे. सिवोक ते रांगपो या ४४ किमी रेल्वेमार्गाचे काम सिक्किममध्ये सुरु आहे. ते पूर्ण होण्याआधी पाक्योंग येथे विमानतळ बांधण्यात आल्याने तेथील लोकांना विमान व रेल्वेसेवा मिळणार आहेत.