All Postpaid Mobile Phones To Be Restored In Kashmir From Monday | Jammu And Kashmir : काश्मिरात उद्यापासून सुरू होणार पोस्टपेड मोबाईल सेवा

Jammu And Kashmir : काश्मिरात उद्यापासून सुरू होणार पोस्टपेड मोबाईल सेवा

ठळक मुद्देसोमवार दुपारपासून काश्मीर खोऱ्यातील सर्व पोस्टपेड मोबाईल सेवा पुन्हा सुरू केल्या जाणार आहेत. गेल्या 69 दिवसांपासून खोऱ्यातील मोबाईल फोन सेवा बंद करण्यात आलेली आहे.  इंटरनेट सेवा सुरू होण्यासाठी मात्र नागरिकांना काही वेळ वाट पाहावी लागणार आहे.

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधूनकलम 370 हटविल्यानंतर तेथील निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येत आहे. सोमवार (14 ऑक्टोबर) दुपारपासून काश्मीर खोऱ्यातील सर्व पोस्टपेड मोबाईल सेवा पुन्हा सुरू केल्या जाणार आहेत. जम्मू-काश्मीर प्रशासनाने याची घोषणा केली आहे. गेल्या 69 दिवसांपासून खोऱ्यातील मोबाईल फोन सेवा बंद करण्यात आलेली आहे.  

कलम 370 घटवल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत सरकारने खोऱ्यातील सर्व प्रकारच्या मोबाईल सेवा बंद केल्या होत्या. सरकारचे प्रवक्ते आणि वरिष्ठ आयएएस अधिकारी रोहित कन्साल यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, 14 ऑक्टोबर रोजी दुपारी पोस्टपेड मोबाईल सेवा पूर्ववत करण्यात येणार आहे. वास्तविक शनिवारीच ही सेवा पूर्ववत करण्यात येणार होती. मात्र शेवटच्या क्षणी निर्माण झालेल्या तांत्रिक अडथळ्यांमुळे हा निर्णय लांबणीवर टाकावा लागला होता. 

इंटरनेट सेवा सुरू होण्यासाठी मात्र नागरिकांना काही वेळ वाट पाहावी लागणार आहे. मोबाईल सेवा बंद असल्यामुळे काश्मीर खोऱ्यातील सात दक्षलक्ष नागरिकांना गैरसोय सोसावी लागत आहेत. त्यावरून राज्याच्या प्रशासनावर टीकाही होत आहे. प्रशासनाही याबाबतीत अनेक पर्यायांवर विचार करत आहे. काश्मीर खोरे पर्यटकांसाठी खुले करण्याचे निर्देश केंद्र सरकारने नुकतेच दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य प्रशासनाने पोस्टपेड मोबाईल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.  

काश्मीरमध्ये परिस्थिती नियंत्रणात राखण्यासाठी कठोर निर्बंध लादण्यात आले होते. आता काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती हळुहळू सामान्य होत असून, काश्मीरमधील राज्य प्रशासनाने पर्यटकांना काश्मीरमध्ये न जाण्यासंदर्भात जारी केलेली सिक्यॉरिटी अ‍ॅडव्हायजरी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. 10 ऑक्टोबरपासून ही अ‍ॅडव्हायजरी मागे घेण्यात येणार असून, त्यानंतर पर्यटकांना काश्मीर खोऱ्यात जाण्याची परवानगी मिळणार आहे. कलम 370 हटवण्यापूर्वी  तीन दिवस आधी 2 ऑगस्ट रोजी  एक सिक्यॉरिटी अ‍ॅडव्हायजरी जारी करून पर्यटकांना काश्मीरमधून बाहेर जाण्यास सांगितले होते. त्यावेळी दहशतवादी हल्ल्याच्या सावटामुळे अमरनाथ यात्रेकरू आणि पर्यकांना शक्य होईल तितक्या लवकर काश्मीर खोरे सोडण्याचा सल्ला देण्यात आला होता. दरम्यान, जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी गृहविभागाकडून काश्मीर खोऱ्यामध्ये जाण्यासाठी जारी करण्यात आलेली ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी हटवण्याचे आदेश दिले आहेत. हा आदेश 10 ऑक्टोबरपासून लागू होईल. 

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: All Postpaid Mobile Phones To Be Restored In Kashmir From Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.