शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

तेलंगणाच्या मैदानात सर्वच राजकीय पक्षांनी डावलले ‘स्त्री शक्ती’ला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 05:59 IST

महिला आरक्षणाच्या चर्चेमुळे विधानसभा निवडणुकांमध्ये महिलांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, तेलंगणा विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांनी महिलांवर अन्याय केला आहे. फारच कमी महिलांना राजकीय पक्षांनी उमेदवारी दिली आहे.

- धनाजी कांबळे

हैदराबाद : महिला आरक्षणाच्या चर्चेमुळे विधानसभा निवडणुकांमध्ये महिलांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, तेलंगणा विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांनी महिलांवर अन्याय केला आहे. फारच कमी महिलांना राजकीय पक्षांनी उमेदवारी दिली आहे.तेलंगणात विधानसभेच्या ११९ जागा आहेत. मात्र, सर्वच पक्षांनी मोजक्या जागांवर महिलांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने तब्बल १०० महिलांना अर्ज दिले होते. प्रत्यक्षात ११ महिलांनाच उमेदवारी दिली. हे प्रमाण केवळ ११ टक्के आहे. सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीने केवळ ४ महिलांना तिकीट दिले आहे. गेल्या वेळी पक्षाने सहा महिलांना उमेदवारी दिली होती. काँग्रेसच्या स्टार उमेदवार खुशबू सुंंदर यांनी महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळालेच पाहिजे, असे म्हटले आहे. आमच्या पक्षाने सुरुवातीला हे विधेयक मांडले. मात्र, हे विधेयक मंजूर होण्याच्या दृष्टीने सध्याच्या एनडीए सरकारने कोणतेही प्रयत्न केले नाहीत.या निवडणुकीत काँग्रेसने ११ महिलांना संधी दिली आहे.टीआरएसने केवळ ४ महिलांनाच संधी दिली आहे, असेही खुशबू म्हणाल्या. माजी मंत्री जे. गीता रेड्डी, डी. के. अरुणा, सुनीता लक्ष्मा रेड्डी व सबिता इंद्रा रेड्डी या रिंगणात आहेत. काँग्रेस आघाडीतील तेलगू देसम १४ जागा लढवत असून, त्यापैकी एका जागी एनटीआर यांची नात सुहासिनी निवडणूक लढवीत आहे.तेलंगणा जन समिती आघाडीत सामील असून, त्या पक्षानेही सिद्धीपेठ मतदारसंघातून भावनी रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे. भाजपाने १४ महिलांना संधी दिली आहे. एमआयएमने मात्र एकाही महिलेला तिकीट दिलेले नाही. आम्ही अधिक महिलांना उमेदवारी दिली असून, एससी, एसटी यांनाही प्रतिनिधीत्व दिल्याचे भाजपाच्या प्रवक्त्याने सांगितले. सीपीएम-बहुजन लेफ्ट फ्रन्टने दहा महिलांना उमेदवारी दिली असून, एका तृतीयपंथीलाही निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.टीडीपीची मोफत सायकलतेलगू देसमचा जाहीरनामा आला असून, त्यात सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी व गुंतवणुकीस मदत करू, असे आश्वासन दिले आहे. आठवीपर्यंतच्या मुलींना सायकल आणि ११ वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप देण्याची घोषणा केली आहे. टीडीपीचे प्रदेशाध्यक्ष एल. रामण्णा म्हणाले की, शेतकºयांचे दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल आणि १0 हजार कोटी रुपये शेतीत खर्च केले जातील. शेतीमालाला किमान आधारभूत किमत दिली जाईल, एका वर्षात एक लाख बेरोजगारांना रोजगार दिला जाईल.आधीच्या आश्वासनांचे काय झाले? - चिदम्बरमतेलंगणाला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर होणारी ही पहिली निवडणूक असली तरीहीके. चंद्रशेखर राव यांचा धडाकेबाज प्रचार दिसत नसून, त्यांनी मौन धारण केले आहे. यामागे भाजपाने प्रतिनिधित्व दिल्याची परोपकारी भावना तर नाही ना, असा खोचक सवाल करीत याआधी सत्तेत येण्यासाठी केसीआर यांनी दिलेल्या आश्वासनांचे काय झाले, ते आधी जनतेला सांगावे, असा सवाल काँग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी केला. हैदराबाद येथील गांधी भवनमध्ये त्यांनी केसीआर सरकारच्या कारभारावर टीका केली. मुस्लिमांना १२ टक्के आरक्षण, २२ लाख घरे, केजी टू पीजी मोफत शिक्षण अशी मोठमोठी आश्वासने के. चंद्रशेखर राव यांनी दिली होती. त्याचे पुढे काय झाले हे आधी सांगावे, असे चिम्दबरम म्हणाले.चंद्राबाबू स्टेजवर नसतील!निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी २३ नोव्हेंबरला राज्यात येणार आहेत. मात्र, काँग्रेस आघाडीत सहभागी झालेल्या तेलुगू देसमचे नेते व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे स्टेजवर सोनिया गांधी यांच्यासोबत नसतील. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत मात्र चंद्राबाबू प्रचारसभांमध्ये स्टेजवर असतील, असे तेलंगणा काँग्रेस कमिटीचे नेते आर. सी. खुंटिया यांनी सांगितले.खा. रेड्डी यांची टीआरएसला सोडचिठ्ठीटीआरएसचे नेते कोंडा विश्वेश्वर रेड्डी यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. हा टीआरएसला हा मोठा धक्का आहे. रेड्डी हे मूळचे वैज्ञानिक असून, अपोलो हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालक संगीता रेड्डी यांचे पती आहेत. रेड्डी यांनी पक्षाचा व लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. टीआरएसचे दोन खासदार आमच्या संपर्कात असून, ते लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असे तेलंगणा काँग्रेसचे नेते रेवण रेड्डी म्हणाले.

टॅग्स :Telangana Assembly Election 2018तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018