शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

'येत्या स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गाणार'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 5:01 PM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते इंद्रेश कुमार यांचं विधान

देहरादून: येत्या स्वातंत्र्यदिनी देशातील सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकेल, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी म्हटलं आहे. १५ ऑगस्टला सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत आणि वंदे मातरम् म्हटलं जाईल, असंही कुमार यांनी सांगितलं. राष्ट्रीय सुरक्षा जागरण मंचाकडून आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. उत्तराखंडच्या देहरादूनमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. येत्या स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांमध्ये ध्वजारोहण करण्याची जबाबदारी मुस्लिम राष्ट्रीय मंचाला देण्यात आल्याचं कुमार म्हणाले. 'मदरशांमधील विद्यार्थ्यांना १५ ऑगस्टला देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची माहिती दिली जाईल,' असंदेखील त्यांनी सांगितलं. इंद्रेश कुमार राष्ट्रीय मुस्लिम मंचाचे मार्गदर्शकदेखील आहेत. उत्तराखंडमध्ये ७०० हून अधिक मदरसे आहेत. यातील ३०० हून अधिक मदरशांची नोंद राज्य सरकारकडे आहे. स्वातंत्र्यदिनी तिरंगा फडकावण्याबद्दल एक अधिकृत सूचना राज्यातील सर्व मदरशांना पाठवण्यात येईल, अशी माहिती उत्तराखंड मदरसा बोर्डचे संचालक बिलाल रहमान यांनी दिली. विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व समजावं, त्यांना स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याची माहिती मिळावी, हे आमचे प्रमुख उद्देश असल्याचंही ते पुढे म्हणाले. उत्तराखंडमधील सर्व मदरशांमध्ये १२ ते १५ ऑगस्ट दरम्यान स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. स्वातंत्र्य दिन आणि मदरसे यांच्याबद्दल इंद्रेश कुमार यांनी केलेल्या विधानावर कानपूरमध्ये वास्तव्यास असलेल्या मौलाना मुफ्ती हानिफ बरकती बरेलवी यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. आम्ही दरवर्षी स्वातंत्र्य दिन साजरा करतो. आम्हाला देशभक्ती दाखवून देण्यासाठी कोणाच्याही प्रशस्तीपत्राची आवश्यकता नाही, असं मत बरेलवींनी व्यक्त केलं.  

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवस