अखिल भारतीय मारवाडी-गुजराथी मंचतर्फे बालमहोत्सवास सुरुवात
By Admin | Updated: July 8, 2015 15:04 IST2015-07-07T22:56:08+5:302015-07-08T15:04:54+5:30
नाशिक : बालमहोत्सवात घेण्यात येणार्या विविध स्पर्धांमुळे मुलांचा वैयक्तिक विकास वाढण्यास निश्चितच हातभार लागेल, असे उद्गार दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष विजय कासलीवाल यांनी अखिल भारतीय मारवाडी-गुजराथी मंच आयोजित बालमहोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी काढले.

अखिल भारतीय मारवाडी-गुजराथी मंचतर्फे बालमहोत्सवास सुरुवात
नाशिक : बालमहोत्सवात घेण्यात येणार्या विविध स्पर्धांमुळे मुलांचा वैयक्तिक विकास वाढण्यास निश्चितच हातभार लागेल, असे उद्गार दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष विजय कासलीवाल यांनी अखिल भारतीय मारवाडी-गुजराथी मंच आयोजित बालमहोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी काढले.
या बालमहोत्सवात नाट्य स्पर्धा, काव्य वाचन स्पर्धा, भावगीत गायन स्पर्धा आणि वत्कृत्व स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते.
मंचाचे अध्यक्ष अजित बागमार यांनी स्पर्धांचे निकाल जाहीर करून विजेत्यांचे अभिनंदन केले. यावेळी बालमहोत्सव समिती अध्यक्ष राजेश बेदमुथा, सरचिटणीस चंदा पारिख, प्रकल्प संयोजक सुनीता चौहान आदि उपस्थित होते.