१९९३ नंतरचे सर्व कोळसा खाणवाटप बेकायदेशीर - सुप्रीम कोर्टाचा दणका

By Admin | Updated: August 25, 2014 15:27 IST2014-08-25T14:40:20+5:302014-08-25T15:27:40+5:30

सर्वोच्च न्यायालयाने १९९३ नंतरचे सर्व कोळसा खाण वाटप बेकायदेशीर ठरवले आहे

All coal blocks allocated illegal since 1993 - Supreme Court bribe | १९९३ नंतरचे सर्व कोळसा खाणवाटप बेकायदेशीर - सुप्रीम कोर्टाचा दणका

१९९३ नंतरचे सर्व कोळसा खाणवाटप बेकायदेशीर - सुप्रीम कोर्टाचा दणका

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २५ - सर्वोच्च न्यायालयाने १९९३ ते २००९ या काळात झालेले सर्व कोळसा खाणींचे वाटप बेकायदेशीर ठरवले आहे. तसेच ज्या खाणी सरकारी कंपन्यांना देण्यात आल्या होत्या व ज्या नंतर खासगी कंपन्यांना देण्यात आल्या, त्यांचे परवाने या निकालामुळे रद्द ठरले आहेत. 
स्क्रीनिंग कमिटीच्या माध्यमातून झालेल्या सगळ्या बैठका आणि त्यानुसार झालेले खाण वाटप बेकायदेशीर असल्याचे व तसेच ते मनमानीपणे करण्यात आल्याचेही सांगितले. पुढील सुनावणीमध्ये बेकायदेशीरपणे काय काय करण्यात आले याचा सविस्तर आढावा कोर्ट घेणार असून सध्यातरी एनडीए व युपीए या दोन्ही सरकारांच्या काळात झालेल्या खाणवाटपाला हा दणका असल्याचे मानण्यात येत आहे.
अर्थात, १९९३ ते २००९ या कालावधीत २१८ खाणींचे वाटप झाले असून त्यातल्या किती ठिकाणी काम सुरू आहे, किती खाणी सरकारी ताब्यात आहेत, किती खाणी खासगी कंपन्यांना देण्यात आल्या आहेत आणि नक्की किती खाणींची परवानगी रद्द करण्यात आली आहे यावर पुढील सुनावणीमध्ये प्रकाश पडण्याची अपेक्षा आहे.

Web Title: All coal blocks allocated illegal since 1993 - Supreme Court bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.