शहरं
Join us  
Trending Stories
1
"ते जिवंत असल्याचा कोणता पुरावाही नाहीये"; इम्रान खानचा मुलगा झाला भावूक, पाकिस्तान सरकारवर गंभीर आरोप
2
कर्नाटकात काँग्रेसचे संकट टळले? डीके शिवकुमार यांनी दिले संकेत, म्हणाले, "मला घाई नाही..."
3
लिव्ह-इन पार्टनरची गळा दाबून केली हत्या, मृतदेह कारमध्ये नेऊन ठेवला आणि झोपी गेला; दारूमुळे...
4
IND vs SA: रोहित शर्मासोबत सलामीला कोण? टीम इंडियाकडे 'हे' दोन पर्याय, कुणाला संधी?
5
Putin: रशिया- युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी पुतिन सकारात्मक; पण झेलेन्स्कींसमोर ठेवली 'अशी' अट!
6
तुमचे जुने आणि फाटकी अंतर्वस्त्रे देशाच्या अर्थव्यवस्थेचं सिक्रेट सांगतात! काय आहे 'मेन्स अंडरवेअर इंडेक्स'?
7
Mumbai Crime: "पैशांसाठी आई मला शेजाऱ्यांकडे पाठवायची अन्..."; दहावीतील विद्यार्थिनीचा धक्कादायक खुलासा!
8
Kapil Sharma : कॅनडामधील कपिल शर्माच्या KAP's कॅफेवर गोळीबार करणाऱ्या शूटरला दिल्लीत अटक
9
कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राने लेकीचं केलं बारसं, ठेवलं हे युनिक नाव
10
ड्रोन हल्ल्यात ३ चीनी इंजिनिअर ठार, अफगाणिस्तानच्या सीमेजवळ सोन्याच्या खाणीत काम करत होते
11
बँक, शेअर, डिविडेंड, इन्शुरन्स.... आता सिंगल पोर्टलवर मिळणार दावा न केलेला पैसा, काय आहे सुविधा?
12
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
13
वॉशिंग्टनमध्ये गोळी लागलेल्या नॅशनल गार्डचा उपचारदरम्यान मृत्यू; दुसऱ्याची मृत्युशी झुंज!
14
महिला योजनांमुळे राज्यांच्या तिजोरीत झालाय खडखडाट; गेमचेंजर योजनेमुळे अर्थव्यवस्थेवर वाढतोय ताण
15
Astrology: राहू पूर्वजन्माचे भोग भोगायला लावतो; तुम्हालाही आलेत का 'हे' वाईट अनुभव?
16
सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात घसरण; रेड झोनमध्ये सेन्सेक्स, निफ्टी; Asian Paints, Max Health, Eicher टॉप लुझर्स
17
पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार! कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट होणार? जगप्रसिद्ध ब्रोकरेज फर्मचा मोठा दावा
18
९० रशियन जहाजांचा गुप्तपणे सागरी प्रवास, ३० जहाजं भारतात पोहोचली; खळबळजनक रिपोर्ट, नेमकं काय घडलं?
19
Crime: विम्याचे ५० लाख हडपण्यासाठी पुतळ्यावर अंत्यसंस्कार, एका चुकीमुळे फसले! दोघांना अटक!
20
VIDEO: दोस्तासाठी काहीपण... विराट कोहलीला हॉटेलवर सोडण्यासाठी खुद्द धोनीने चालवली कार
Daily Top 2Weekly Top 5

"मी व्हेकेशन, आराम विसरली, मला फक्त..."; आमदार होताच जोरदार कामाला लागल्या मैथिली ठाकूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 12:13 IST

Maithili Thakur : अलीनगर विधानसभा मतदारसंघ जिंकल्यानंतर भाजपा आमदार मैथिली ठाकूर जोरदार कामाला लागल्या आहेत.

अलीनगर विधानसभा मतदारसंघ जिंकल्यानंतर भाजपा आमदार मैथिली ठाकूर जोरदार कामाला लागल्या आहेत. त्यांना मतदारसंघातील लोकांबद्दलच्या जबाबदारीची खोलवर जाणीव झाली आहे. विजयानंतर लोकांसाठी काम करण्याची स्ट्राँग फिलिंग आणि वचनबद्धता जाणवली आणि त्याच उत्साहाने मैदानात उतरल्याचं मैथिली ठाकूर यांनी म्हटलं आहे.

मैथिली ठाकूर हसून म्हणाल्या की, "निवडणूक जिंकल्यानंतर सुटी, आराम किंवा व्हेकेशन या शब्दांचा अर्थ विसरली आहे. मला आतून एक स्ट्राँग फिलिंग येत आहे की मी आणखी उशीर करू शकत नाही. मला फक्त काम करायचं आहे. मी सतत लोकांना भेटत असते आणि दररोज मी प्रत्येक काम कसं पुढे न्यायचं याचा विचार करते."

"जनतेने मला मोठ्या अपेक्षांनी निवडून दिलं आहे आणि त्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. आमदार होणं म्हणजे फक्त एक खूर्ची नसून लोकांच्या जीवनात बदल घडवून आणणं हेच ध्येय आहे." निवडणूक प्रचारादरम्यान, लोकांनी त्यांना परिसरातील अनेक प्रमुख समस्यांबद्दल माहिती दिली. खराब रस्त्यांची परिस्थिती, पाण्याची कमतरता, आरोग्यसेवेचा अभाव आणि रोजगार आणि शिक्षणाशी संबंधित समस्या आहेत.

मैथिली म्हणाल्या की, "आमच्या टीमने या समस्यांची एक विस्तृत यादी तयार केली आहे. आता पदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच या मुद्द्यांवर काम वेगाने सुरू होईल. प्रत्येक कामाची सुरुवात कशी करायची याचं नियोजन करण्यासाठी दररोज मी टीमला भेटते. जनतेने आमच्यावर ठेवलेला विश्वास पूर्ण करणं हेच प्राधान्य आहे."

लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूर लोकगीतांसाठी ओळखल्या जातात आणि बिहारमध्ये त्या खूप प्रसिद्ध आहेत. म्हणूनच जेव्हा मैथिली यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्या सर्वसामान्य लोकांसाठी काय, काय करतील हे पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. भाजपाने मैथिली ठाकूर यांना दरभंगा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या अलीनगर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी दिली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : MLA Maithili Thakur Dives Into Work, Forgets Vacation After Victory

Web Summary : Newly elected MLA Maithili Thakur is dedicated to serving her constituency. Focused on addressing issues like roads, water, healthcare, and education, she's working tirelessly to fulfill the people's expectations and improve their lives, prioritizing action over leisure.
टॅग्स :BiharबिहारElectionनिवडणूक 2024BJPभाजपाPoliticsराजकारण