मुलींनीच दिला बापाच्या पार्थिवास खांदा, लॉकडाऊनमध्ये उपचाराअभावी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2020 15:30 IST2020-04-05T15:26:56+5:302020-04-05T15:30:21+5:30
लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम पहायला मिळत असला तरी अनेकांना लॉकडाऊनमुळे गंभीर प्रसंगांना तोंड द्यावं लागत आहे.

मुलींनीच दिला बापाच्या पार्थिवास खांदा, लॉकडाऊनमध्ये उपचाराअभावी मृत्यू
कोरोना व्हायरसचं संक्रमण होण्यापासून जास्तीत जास्त लोकांना वाचवता यावं यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम पहायला मिळत असला तरी अनेकांना लॉकडाऊनमुळे गंभीर प्रसंगांना तोंड द्यावं लागत आहे. अशीच एक घटना समोर आली आहे ते पाहून तुमचे डोळे पाणावतील.
उत्तरप्रदेशातील अलीगड येथिल रहिवासी असलेल्या संजय कुमार नावाच्या व्यक्तीचा लॉकडाऊन दरम्यान मृत्यू झाला आहे. संजय कुमार यांच वय ४५ वर्ष होतं. त्यांना टीबीचा आजार होता. लॉकडाऊनमळे योग्य उपचार न मिळाल्यामुळे शनिवारी त्यांचा मुत्यू झाला. त्यांना पाच मुली आहेत. अशावेळी मुलींनी मुलांची जबाबदारी पार पाडली. आपल्या वडिलांच्या पार्थिवाला स्वतःचं खांदा दिला आहे. ४५ वर्षीय संजय चहा विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते.
अत्यंत हालाखीची परिस्थिती असताना सुद्धा कोणासमोरही हात पसरले नाहीत. त्यांना सहा महिन्यांपासून टीबीचा आजार होता. जास्त त्रास वाढल्यानंतर ते जिल्हा रुग्णालयात जाऊन उपचार घ्यायचे. लॉकडाऊन दरम्यान प्रकृती बिघडल्यामुळे तपासणीसाठी योग्यवेळी डॉक्टर उपलब्ध नव्हते . म्हणून संजय यांचा मृत्यू झाला. नंतर डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत त्यांनी टिबी नसल्याचं दिसून आले. त्यामुळे स्थानिक डॉक्टरांशी संपर्क साधूनअधिक माहिती घेतली जात आहे.